Agriculture news in marathi 170 crores of grains are exhausted | Agrowon

भंडारा : धानाचे १७० कोटींचे चुकारे थकीत 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

आधारभूत किमती प्रमाणे सातशे कोटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये धानाची किंमत आहे. यातील तब्बल १७० कोटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

भंडारा : खरीप हंगामात पणन महासंघाने ३७ लाख ५१ हजार २९० घराची खरेदी केली आधारभूत किमती प्रमाणे सातशे कोटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये धानाची किंमत आहे. यातील तब्बल १७० कोटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

धान्याचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. या जिल्ह्यात पणन महासंघाकडून हमीभावाने खरेदी होते. १८३५ रुपये हमीभाव, पाचशे रुपये बोनस व दोनशे रुपये सानुग्रह अनुदान धानाला जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पणन महासंघाच्या केंद्रांवर आवक वाढली. हंगामात तब्बल ३७ लाख ५१ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेला हा धान्य गोदामात ठेवला जातो. तिथून तो भरडाईसाठी पाठवला जातो. 
या वर्षी मात्र भरडाईच्या दरावरून मिलर्स आणि शासन यांच्यात वाद निर्माण झाला. परिणामी, भरडाईसाठी धानाची उचलच करण्यात आली नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या एकूण ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानापैकी केवळ एक लाख पंचवीस हजार क्विंटल धानाची भरडाई आजवर होऊ शकली. तब्बल ३६ लाख क्विंटल धान अद्यापही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. 

भंडारा जिल्ह्यात २०३ मी लसूण त्यापैकी दीडशे मिलर्संना भरडाईसाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नाही. जिल्ह्यातील २५० गोदाम धानाने भरले असून, अर्धेअधिक धान उघड्यावर आहे. माॅन्सूनपूर्व पावसाचे आगमन सर्वदूर झाले आहे. त्यामुळे उघड्यावरील हा धान पावसामुळे भिजत खराब होण्याची भीती वर्तवली जात आहे. धान भिजू नये याकरिता त्यावर ताडपत्रीचे संरक्षण दिले आहे. मात्र ती व्यवस्था पुरेशी नसल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे खरीप हंगामातील धानाची भरडाई रखडल्याने गोदामात जागा नाही. परिणामी, उन्हाळी धान खरेदीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...