पुणे जिल्ह्यात पाण्याचे १७५ नमुने दूषित

पुणे जिल्ह्यात पाण्याचे १७५ नमुने दूषित
पुणे जिल्ह्यात पाण्याचे १७५ नमुने दूषित

पुणे : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील २ हजार ६७८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये १७५ ठिकाणी दूषित पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये खेड तालुक्‍यात सर्वाधिक दूषित पाण्याचे नमुने आढळून आले असून, हे पाणी स्वच्छ करण्यासाठी क्‍लोरीन पावडरसह आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात याव्या, असे आदेश गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विहीर, बोअरवेल आदी पाण्याचे स्रोत यांसह नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याद्वारे दूषित पाणी पिल्याने जुलाब, उलटी, पोटदुखी, टायफाइड, गॅस-स्ट्रो यांसारख्या जलजन्य आजार होतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते. पाण्याच्या शुद्धतेसाठी ‘टीसीएल’चा वापर प्रामुख्याने केला जातो. टीसीएलमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण २० टक्के आहे का, याची तपासणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून केली जाते. क्लोरीनचे प्रमाण कमी असल्यास टीसीएल पावडर बदलून देण्यात येते.

ऑक्‍टोबर महिन्यात १३ तालुक्‍यांत तपासणी करण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १७५ ठिकाणी नागरिक दूषित पाणी पित असल्याचे आढळून आले. खेड तालुक्‍यात सर्वाधिक ३९ ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या तपासणीमध्ये ५९ ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले होते. त्यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यात २९ ठिकाणी दूषित पाण्याचे साठे आढळून आले.

बारामती तालुक्यात ६, भोर ११, दौंड ७, हवेली १, इंदापूर ९, जुन्नर २१, खेड ३९, मुळशी १४, पुरंदर १३, शिरूर तालुक्यांत २५ नमुने दूषित आढळून आले आहेत. तर मावळ आणि वेल्हे वेल्हे तालुक्यांत एकही नमुना दूषित नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी आरोग्याला अपायकारक असे दूषित पाणी पिऊ नये, पाण्याच्या शुद्धतेबाबत काही तक्रारी असतील, तर आरोग्य विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com