‘म्हैसाळ’मधून १.७७ कोटींची वसुली 

दुष्काळी चार तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी वितरित करणाऱ्या म्हैसाळ योजनेचे यंदाचे उन्हाळी आवर्तन लॉकडाऊनमध्येही सुरळीत सुरू आहे. दोन महिन्यांत २.३७ टीएमसी पाणी वितरण आणि १.७७ कोटी रुपयांची वसुल झाली आहे.
kalwa.
kalwa.

सांगली : दुष्काळी चार तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी वितरित करणाऱ्या म्हैसाळ योजनेचे यंदाचे उन्हाळी आवर्तन लॉकडाऊनमध्येही सुरळीत सुरू आहे. दोन महिन्यांत २.३७ टीएमसी पाणी वितरण आणि १.७७ कोटी रुपयांची वसुल झाली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.  म्हैसाळ उपसा सिंचन योजना ५ मार्च ते ३० एप्रिल अखेर जवळपास दोन महिन्यात २३७७.९७ दशलक्ष घनफुट म्हणजेच जवळपास सव्वा दोन टीएमसीहुन अधिक पाणी वितरण म्हैसाळ योजनेतून सिंचनासाठी करण्यात आले आहे. तसेच मिरज कवठेमंकाळ तासगाव आणि जत या चार तालुक्यातील मिळून एकूण १ कोटी ७७ लाख ३० हजार ५३२ रुपये शेतकऱ्यांनी वितरित करण्यात येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वसुलीपोटी दिले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.  याशिवाय म्हैसाळ योजनेचे मुख्य पाच टप्पे व उप उपसा सिंचन योजनेतून असे एकूण मिळून सतत एकूण ७० ते ८२ उपसा पंप विविध पंपगृहात सुरू असून त्यातून हे पाणी वितरण सुरू आहे. या पाण्याचा जिल्ह्यातील सर्व पिकांबरोबर द्राक्षपिकांच्या खरड छाटणीसाठी, ऊस फळभाज्या व सर्व फळपिके यांना मोठा लाभ होत आहे.   शेतीसाठी वरदायिनी असणाऱ्या म्हैसाळ योजनेवर कोरोना आपत्ती फारसा वाईट प्रभाव दाखऊ शकला नाही. योजनेचा सध्याचा सुरळीतपणा त्यामुळे कौतुकास्पद ठरत आहे. यात म्हैसाळ योजनेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि वसुलीतून सिंचन योजनेला बळ देणारे संबंधित शेतकरी यांचा मोठा वाटा आहे.    तालुकानिहाय सिंचनासाठी वितरित करण्यात आलेले पाणी व वसुली रक्कम अशी 

तालुका वितरित केलेले पाणी. पाणी वसूल रक्कम 
मिरज ७४० दशलक्ष घनफुट ८७ लाख १४ हजार ३६८ रुपये 
कवठेमहांकाळ ४६८ दशलक्ष घनफुट ३१ लाख ७२ हजार ८५० रुपये 
तासगाव १४१ दशलक्ष घनफुट २१ लाख ५१ हजार १२० 
जत ८३४.६ दशलक्ष घनफुट ३६ लाख ९२ हजार १९४ रुपये 

पिकांसाठी धडपड   सध्या देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरू असून सांगली जिल्ह्यातही त्याचे सर्व परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहेत. त्यामुळे वसुली रक्कम गोळा करणारे व पाणी वितरण करणारे कर्मचारी यांनी मास्क, सॅनिटायजर यांसह सोशल डिस्टन्सिंग याचे सर्व नियम पाळून काम सुरू आहे. ठराविक प्रमुख शेतकरी यांना भेटून पाणी वितरणाबाबत धोरण सांगण्यात येत आहे. शेतकरीही वसुलीत सहकार्य देत असून पाणी वितरण सुद्धा त्या तुलनेत सुरू आहे. म्हैसाळ योजनेच्या बैठ्या बैठकांना फाटा दिला असून सोशल डिस्टन्स ठेऊन आवश्यक तेथेच सोशल डिस्टन्स पाळून समन्वय साधला जात आहे. अगदी वसुली रक्कम घेताना सुद्धा सुरक्षितता घेतली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com