agriculture news in Marathi 18 crore arrears stuck of milk federation Maharashtra | Agrowon

भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे अडले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे गेल्या १६० दिवसांचे चुकारे अडविल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. १८ कोटी रुपयांची ही रक्‍कम तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जिल्हा दूध संघाला घेराव घालण्यात आला. थकीत र‍कमेसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे गेल्या १६० दिवसांचे चुकारे अडविल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. १८ कोटी रुपयांची ही रक्‍कम तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जिल्हा दूध संघाला घेराव घालण्यात आला. थकीत र‍कमेसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात धानाची लागवड होते. एकाच पिकावर भिस्त असल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा अतिरिक्‍त स्रोत म्हणून दुग्ध व्यवसायावर भर दिला आहे. जिल्ह्याची दुधाची उलाढाल ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे. भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय सुमारे १०० कोटी रुपयांचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध उत्पादक संस्था असून, त्या दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना जिल्हा सहकारी दूध संघाने एप्रिल २०१९ पासून संस्थांचे देयक अडविण्याचा प्रकार घडला आहे. 

या प्रकारामुळे संस्थांसमोरील आर्थिक कोंडी वाढली आहे. अनेक लहान संस्था बंद पडल्या. त्यानंतरही त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही. या संस्थांचे १६० दिवसांचे अर्थात १६ आठवड्याचे देयक तातडीने देण्यात यावे. याकरिता दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचा आरोप आहे. या विरोधात संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध उत्पादकांनी संघाला घेराव घातला. या वेळी दुधाचे थकीत देयकाची रक्‍कम न मिळाल्यास दुधाचा पुरवठा संघाला न करण्याचा इशारा देण्यात आला.


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...