कास धरणासाठी १८ कोटी निधी मंजूर

18 crore funds sanctioned for Kas Dam
18 crore funds sanctioned for Kas Dam

सातारा : कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मार्गी लावावे, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करावे. सज्जनगडावर परळी येथून रोप वे करावा, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. त्याची दखल घेत पवार यांनी या सर्व मागण्या मान्य करून तातडीने कास धरणासाठी १८ कोटी निधी मंजूर केला. तसेच, शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय व इतर कामांसाठीही निधीची तरतूद केली, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. 

पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीचा आढावा मंत्री पवार यांनी नुकताच घेतला. सातारा जिल्ह्यासाठी झालेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजेंनी कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामासाठी आवश्‍यक असणारा उर्वरित निधी तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. या कामासाठी १८ कोटी रुपये तातडीने पालिकेस मिळावे, तसेच सुधारित प्रकल्प अहवालानुसार वाढीव ४२ कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी पुरवणी मागणी मंजूर करून निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशीही मागणी केली. या कामासाठीचा तातडीचा १८ कोटी रुपये निधी त्वरित मंजूर करून मंत्री पवार यांनी पुरवणी मागणीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सुरू करा 

जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पदनिश्‍चिती आणि पदनिर्मिती करण्यात आली. दरम्यान, प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली. त्यास मंत्री पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. देगाव टप्पा क्रमांक तीन एमआयडीसीच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्री आणि औद्योगिक व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com