बुलडाण्यात १८ चारा छावण्यांची तयारी

बुलडाण्यात १८ चारा छावण्यांची तयारी
बुलडाण्यात १८ चारा छावण्यांची तयारी

बुलडाणा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे. जिल्हाभरात तीव्र टंचाईच्या महसूल मंडळात अशा प्रकारच्या १८ छावण्या उभारण्याची तयारी सुरू आहे.

जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झाला. तोही अनियमित स्वरूपातील होता. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. शिवाय यामुळे चाऱ्याचाही प्रश्न तयार झाला. सध्या पशुधनासाठी चारा आहे. मात्र येत्या एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठक घेत संबंधित विभागांना टंचाई निवारण्याच्या उद्देशाने तयारी करण्याचे सांगितले आहे. तालुकास्तरीय समित्यांचेही या निमित्ताने गठन करण्याचे सुचविण्यात आले.

जिल्ह्यात सुमारे १० लाख ७२ हजारांवर पशुधन आहे. लहान जनावरांना तीन किलो, मोठ्या जनावरास सहा किलो, तर शेळ्या-मेंढ्यासाठी ६०० ग्रॅम चाऱ्याची गरज भासेल. मार्चअखेर जिल्ह्यात सुमारे चार लाख मेट्रीक टन चाऱ्याची टंचाई भासू शकते. पुढील महिन्यात याहीपेक्षा अधिक टंचाई वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील पशुधनाची गरज भागविण्यासाठी प्रतिदिवस ४० हजार मेट्रिक टन चारा हवा. प्रशासनाच्या मते सध्या सात लाख मेट्रिक टन चारा आहे.

टंचाई वाढल्यास प्रशासनाने जिल्ह्यातील ९० महसूल मंडळापैकी १८ मंडळात चारा छावण्या उभारण्याची तयारी ठेवली. यात प्रामुख्याने खामगाव तालुक्यातल सहा, चिखलीमध्ये चार आणि इतर मंडळाचा समावेश राहू शकतो. शक्यतो या चारा छावण्या एप्रिल महिन्यापासून काही ठिकाणी उघडण्याची गरज निर्माण होऊ शकते. यासोबतच मे महिन्यातही अशीच गरज वाढून १८ छावण्या उघडण्याची शक्यता आहे. जनावरांना पिण्यासाठी पाण्याचीही उपलब्धता कमी आहे. प्रकल्पांमध्ये पुरेशे पाणी नसल्याने जनावरांसाठी दिवसेंदिवस पाण्याचाही प्रश्न बिकट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com