Agriculture news in marathi 18 sugar factories closed in Pune region | Agrowon

पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर कारखाने बंद

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. तरीही अजूनही अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही. पुणे विभागात अजूही १८ साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे चालू वर्षी नक्की किती साखर कारखाने सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. तरीही अजूनही अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही. पुणे विभागात अजूही १८ साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे चालू वर्षी नक्की किती साखर कारखाने सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १६ साखर कारखान्यांचे धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला आहे. उर्वरित कारखान्याचाही गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत सुरू होणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  

यंदा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून एफआरपीचा मुद्दा पुढे केला होता. एफआरपी दिल्याशिवाय परवाने दिले जाणार नाही, अशी भूमिका साखर आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार राज्यातील १६३ कारखान्यांनी गाळपासाठी परवाने मागितले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ८९ हून अधिक साखर कारखान्यांनी परवाने घेऊन साखर कारखाने सुरू केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दहा, तर सातारा जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांचाही समावेश आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत हे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास ३४ साखर कारखाने आहेत. त्यांनी चालू गळीत हंगामात १५ लाख मेट्रिक टनांहून साखरेचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात, तर सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे उसाच्या लागवडीत घट झाली असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाखाहून अधिक हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर कारखाना स्थळावर दाखल होत आहेत. उसाच्या तोडणीस काही ठिकाणी प्रारंभ झाला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणासाठी मजुरांएेवजी, ऊसतोडणी यंत्राचा वापर होणार आहे. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर वर्दळ वाढली असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दरवर्षी आॅक्टोबर, नोव्हेबर महिन्यात होतो. त्यासाठीशेतकरी मोठ्या प्रमाणात लागवडी करतात. विभागात साधारणपणे उसाचे सरासरी दरवर्षी दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र असते. 

२३ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन 

विभागात सहकारी व खासगी कारखान्यामध्ये सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव, संत तुकाराम, विघ्नहर, भीमा शंकर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर्स, बारामती अॅग्रो, व्यंकटेश शुगर, पराग, श्रीराम फलटण, कृष्णा, लो.बा. देसाई, सह्याद्री, अजिक्यतारा, जयशंत असे एकूण दहा साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांनी ४२ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून २३ हजार ७०० क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ५.५१ टक्के एवढा आहे, असे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...
नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर...नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी...
नाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गोसेखुर्द प्रकल्पासाठी भूसंपादनाचा तिढा...नागपूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान...
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव...बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या...
राज्यात कृषी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया...पुणे ः राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...