Agriculture news in Marathi 1800 crore sugar export subsidy sanctioned | Agrowon

साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात झालेल्या साखरेचे १८०० कोटी रुपयांचे अनुदान  नुकतेच मंजूर केले. हे अनुदान लवकरच कारखान्यांना मिळणार आहे.

कोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात झालेल्या साखरेचे १८०० कोटी रुपयांचे अनुदान  नुकतेच मंजूर केले. हे अनुदान लवकरच कारखान्यांना मिळणार आहे. यंदाच्या हंगामात ६० लाख टन साखर निर्यात झाली होती, यापोटी ३५०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्राकडे देय होते. यापैकी १८०० कोटी रुपये केंद्राने मंजूर केले आहेत.

साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त साखर निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केंद्राने थकीत अनुदान तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरअखेर गेल्या तीन वर्षांत प्रलंबित राहिलेले सर्व अनुदान मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून निधी जाहीर झाल्यानंतर शिल्लक अनुदान लवकरच देण्यात येणार असल्याचे अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

गेल्या दोन वर्षांपासून साखरनिर्यातीसाठी देशभरातील कारखान्यांनी पसंती दिली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति टनास पाचशे डॉलरच्या आसपास साखरेचे दर राहिले आहेत. विशेष म्हणजे यात सातत्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच येणाऱ्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने फ्युचर मार्केट ही तेजीत आहे. यामुळे साखर कारखान्यांनी अनुदान किती मिळते हे न पाहता जास्तीत जास्त साखरेची निर्यात करावी, असे आवाहन साखर उद्योगाने कारखानदारांना केले आहे. याचा फायदा घेत अनेक कारखानदार विविध देशांना साखरनिर्यात करत आहेत. साहजिकच याचा फायदा स्थानिक बाजारातील साखरदर वाढण्यावर झाला आहे. 

देशांतर्गत बाजारात ३५०० रुपये क्विंटलच्या वर दर मिळत आहे. आता केंद्रानेही निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी मागील थकीत सर्व अनुदान ऑक्टोबरअखेर देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. केंद्राकडून अनुदान तातडीने मिळाल्यास कारखाने साखर निर्यातीसाठी आणखीन प्रयत्न करतील, असा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाचा आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने मी स्वतः केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांशी याबाबत चर्चा केली. त्यांनी निर्यातीचे मागील सर्व थकीत अनुदान ऑक्टोबरअखेर देण्याचे आश्‍वासन दिले आहे. ही नक्कीच उद्योगाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.
 - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...