agriculture news in Marathi 181 corona positive in agriculture department Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१ जणांना लागण

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी खात्याला बसत आहे. आजपर्यंत राज्यात सुमारे १८१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असून यात आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. 

अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी खात्याला बसत आहे. आजपर्यंत राज्यात सुमारे १८१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असून यात आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संसर्ग झालेल्यात बुलडाणा जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्वाधिक १९ संख्या असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाने इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे विम्याचे संरक्षण दिले तोच न्याय कृषी खात्याला लावावा अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. 

कोरोनाच्या काळात सक्रियपणे राज्याचा कृषी विभाग काम करीत आहे. खरिपात बियाणे, खतांचे वितरण, पेरणीसाठी सल्ला, बांधावर जाऊन शेतीशाळा, विविध प्रकारचे पंचनामे, बैठका अशी कामे कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. यातच शेतकऱ्यांसोबतचाही संपर्क कायम आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग आता गाव-खेड्यांमध्ये वाढला आहे. कृषी खात्यात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. 

राज्यात बुलडाणा जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक १९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी एका कृषी सहायकाचा मृत्यू झाला असून सध्या १३ जणांवर उपचार सुरु आहेत. बुलडाणा पाठोपाठ खात्यात रायगड जिल्ह्यात १६  जणांना लागण झालेली आहे. यानंतर सातारा जिल्ह्यात १३ जणांना संसर्ग झाला. कृषी खात्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.  राज्यात या खात्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी सहायक संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी विलास रिंढे यांनी दिली. 

विम्याची मागणी
सध्या जवळपास ११९ अधिकारी, कर्मचारी विविध जिल्ह्यात उपचार घेत आहेत. कृषी विभागाने कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या सहकार्याने शेतमाल बाजारपेठा, ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी साखळी उभारण्याचे काम केले. सोबतच खरिपाची विविध कामे, योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सुरु ठेवलेले आहे. अशा जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाने इतर विभागाप्रमाणेच विम्याचा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र याबाबत अजून कुठलीही घोषणा, आश्वासन देण्यात आलेले नाही.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...