Agriculture news in marathi 181 crore aid for affected crops in Nashik district | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची मदत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने १८१ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नुकसानीपोटी मदत देण्याची मागणी सरकारकडे करावी लागणार आहे. 

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने १८१ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नुकसानीपोटी मदत देण्याची मागणी सरकारकडे करावी लागणार आहे. 

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेण्यात आले होते. नांदगाव, निफाड, मालेगाव, सिन्नर, चांदवड, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, कापूस या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त झालेली रक्कम पुरेशी नाही. १८१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून, बाधित शेतकऱ्यांची संख्याही सात लाखांहून अधिक आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या वाट्याला २ हजार ३२९ रुपये येणार आहेत.

शेतकऱ्यांचे कितीही क्षेत्रावरील नुकसान झाले असले तरी त्यांना केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठीच मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतपिकांसाठी अधिकाधिक १६ हजार रुपये, तर बागायत पिकांसाठी अधिकाधिक ३६ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. शिवाय प्राप्त अनुदान दोन हेक्टरच्या आतील व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच देण्याबाबतचे आदेश असून, त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा कमी आणि दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागणी ६३६ कोटींची; मिळाले फक्त १८१ कोटी 

शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. सरकारने शेतपिकांसाठी प्रतिहेक्टर आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान असल्याने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे मंगळवारी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात नुकसान असे...

 बाधित गावे १ हजार ९५९ 
बाधित शेतकरी ७ लाख ७६ हजार ९७०
बाधित क्षेत्र ६ लाख ४७ हजार ३१५.६६

पिकांचे नुकसान असे (हेक्टरमध्ये) 

जिरायती पिके ४ लाख ९ हजार २७५ 
बागायती पिके १ लाख ५६ हजार ३५०
बहुवार्षिक फळपिके ८१ हजार २७०

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात रब्बीच्या पेरणीला वेगजळगाव : खानदेशात कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी...
शेतीच्या फायद्यासाठी एकसंघपणे प्रयत्न...जालना : ‘‘कृषी विभागाची विस्तार सेवेची भूमिका...
ओट पिकावरील करपा रोगांसाठी कारणीभूत...ओट पिकामध्ये करपा रोगाच्या प्रादुर्भावानंतर...
प्रखर प्रकाशाचा पक्ष्यांवर होतो विपरीत...चमकत्या प्रखर प्रकाशांचा परिणाम मोठ्या...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार...
शेतकऱ्याने १८ एकरांतील कपाशीत घातली...अकोला ः जिल्ह्यातील कापूस क्षेत्र यंदा बोंड अळीने...
गोदावरी खोरे सिंचन आराखडा सरकारने...नांदेड : आपल्या शासनाच्या काळात मराठवाड्यातील...
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...