agriculture news in Marathi 183 poisoning cases in Amravati district Maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना फवारणीदरम्यान विषबाधा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

२०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत राज्यभरात २२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जागृती करण्यात आली.

अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत राज्यभरात २२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जागृती करण्यात आली. परंतु तरीही अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी, मजुरांना विषबाधा होत दोघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. 

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जणांच्या प्रकृतीत उपचाराअंती सुधारणा झाली. फवारणीदरम्यान विषबाधा होत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असलेल्या दोघांचा व्हिसेरा अद्याप अप्राप्त आहे. त्यामुळे त्यांचा कीटकनाशक फवारणीदरम्यान मृत्यू झाला याविषयी स्पष्टता नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

विशेष म्हणजे फवारणीदरम्यान काय काळजी घ्यावी, याविषयी कृषी विभागाकडून सातत्याने जागृती केली जात आहे. या मोहिमेवर मोठा खर्चही दरवर्षी होतो. काही कंपन्यांना देखील जिल्हानिहाय प्रसाराबद्दल सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतर देखील विषबाधांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची स्थिती आहे. विषबाधा झाल्यास डोळे जळजळणे, चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात, असेही कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कृषी विभागाचे आवाहन 

  • लेबलक्‍लेम किंवा शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी 
  • जखम असलेल्या व्यक्‍तींनी फवारणी करू नये 
  • फवारणी करताना विडी, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करू नये 
  • हवेच्या दिशेनेच फवारणी करावी 
  • फवारणीदरम्यान त्वचा डोळे व श्‍वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते 
  • बाधित व्यक्‍तीच्या अंगावरील कपडे त्वरित बदलावे 
  • बाधित व्यक्‍तीचे अंग साबणाने स्वच्छ धुवावे, त्याला त्वरित ओकारी करायला लावावी 
  • श्‍वासोच्छ्वास योग्यरीतीने होत आहे का याची चाचपणी करावी 
  • व्यक्‍ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावेत 
  • बाधिताला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये 

इतर अॅग्रो विशेष
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...