agriculture news in Marathi 187 crore for milk powder scheme Maharashtra | Agrowon

दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

प्रतिदिन १० लाख लीटर दुधाचे रूपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.

मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लाख लीटर दुधाचे रूपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. 

केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण देशामध्ये २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टारंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहेत. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांपुढे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झालेला होता. 

अतिरिक्त दुधाच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली ३१ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (पदुम), आयुक्त, दुग्धव्यवसाय, व्यवस्थापकीय संचालक, महानंद व इतर अधिकारी उपस्थित होते. 

भुकटी करण्याच्या प्रस्तावास मान्यता 
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांनी राज्यातील प्रतिदिन १० लाख लीटर अतिरिक्त होणाऱ्या दुधाचे रूपांतरण दूधभुकटीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने प्रतिदिन १० लाख लीटर दूधाचे रूपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी १८७ कोटी निधीची मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...