मॉन्सून हंगामात पावसामुळे देशात १,८७४ मृत्यू

मॉन्सून हंगामात पावसामुळे देशात १,८७४ मृत्यू
मॉन्सून हंगामात पावसामुळे देशात १,८७४ मृत्यू

नवी दिल्ली : यंदाच्या मॉन्सून हंगामात जवळपास सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. या पावसाचा आणि त्यामुळे आलेल्या पुराचा २२ राज्यांमधील २५ लाख लोकांना फटका बसला असून जवळपास १,८७४​ जणांचा पावसासंबंधीच्या घटनांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.  भारतात पावसाचे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात (३८२) गेले असून त्यानंतर पश्‍चिम बंगालमध्ये २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मॉन्सून हंगाम अधिकृतरित्या ३० सप्टेंबरला संपला असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. १९९४ नंतर प्रथमच देशभरात इतका पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला असून ७.१९ लाख जणांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला.  देशभरात पावसाचा दणका 

  • आत्तापर्यंत मृत्यू :  १,८७४
  • एवढ्या जिल्ह्यांना फटका  :  ३५७
  • नागरिक जखमी :  ७३८
  • जनावरे मृत्युमुखी :  २०,०००
  • घरांचे पूर्ण नुकसान :  १.०९ लाख
  • घरांचे अंशत: नुकसान :  २.०५ लाख
  • हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान :  १४.१४ लाख
  • राज्य मृत्यू 
    महाराष्ट्र ३८२ 
    पश्‍चिम बंगाल २२७ 
    मध्य प्रदेश १८२ 
    केरळ १८१ 
    गुजरात १६९ 
    बिहार १६१ 
    कर्नाटक १०६ 
    आसाम ९७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com