जळगाव जिल्ह्यात मदतीसाठी १९ कोटी

जळगाव : शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी १९ कोटी रुपये निधी वितरित केला आहे.
19 crore for assistance in Jalgaon district
19 crore for assistance in Jalgaon district

जळगाव : शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी १९ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. एकूण १९ कोटी ५५ लाख १६ हजार रुपये निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या नुकसानीसंबंधी ही मदत वितरित झाल्याचे म्हटले आहे. त्याचे परिपत्रक जारी झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडे हा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, दिवाळीपूर्वी तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोचेल की, नाही, यासंदर्भात शंका आहे. कारण, दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला सुट्टी आहे. नंतर दुसऱ्या शनिवारची सुट्टी १४ रोजी आहे.

रविवारी हक्काची सुट्टी असेल. लागलीच सोमवारी (ता.१६) दीपावली-पाडव्याचा सण आहे. बँकांना सुट्ट्यांचा परिणाम मदतनिधी वितरणावर होईल.  

हंगामी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतनिधी दिला जाईल. त्यात खरिपातील पिकांच्या नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत निधी दिला जाईल. ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी या नुकसानीसंबंधी पात्र आहेत. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २५ हजार रुपये दिले जातील. 

जळगाव जिल्ह्यात क्षतिग्रस्त घरे, मनुष्यहानी, वस्त्र, घरगुती वस्तूंसाठी साहाय्य म्हणून २८ लाख रुपये, मृत जनावरांच्या भरपाईसाठी आठ लाख ३७ हजार, नष्ट झालेली घरे, झोपड्या, गोठे यासाठी १० लाख सहा हजार, शेत जमिनी खरडणे व इतर नुकसानीसाठी २८ लाख ६३ हजार, पीक नुकसानीपोटी १२ कोटी ८१ लाख ९८ हजार रुपये व वाढीव दरांच्या नुकसानीच्या रकमेसंबंधी पाच कोटी ९८ लाख १२ हजार रुपये, अशी मिळून १९ कोटी ५५ लाख १६ हजार रुपये मदत दिली जाईल. 

मदत तत्काळ जमा करा

जिल्ह्यासाठी २६ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. ३६ हजार हेक्टरचे अतिपावसात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाला सादर केली होती. पण, भरपाई कमी मिळाली आहे. वितरण त्वरित करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com