agriculture news in Marathi 19 crore transfer to farmers of PM Kisan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा 

पीटीआय
शनिवार, 15 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१४) देशातील जवळपास १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम-किसान) आठवा हप्ता जमा केला.

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१४) देशातील जवळपास १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम-किसान) आठवा हप्ता जमा केला. या वेळी १९ हजार कोटी थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा ८ वा हप्ता वितरित करण्यात आला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पात्रताधारक शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी थेट जमा करण्यात आले. याचा जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला. तर पश्‍चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला. 

‘‘शेतीमध्ये नविन संधी, पर्याय आणि उपाययोजना करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. सरकार सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सेंद्रिय शेतीतील पिकांचा उत्पादन खर्चही कमी आहे. तसेच मृदा, आपल्या आरोग्यासाठीही ही पिके लाभदायक असून त्यांना जास्त दरही मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले. 

हमीभावाने शेतमाल खरेदीचा विक्रम 
देशात कोरोनाचे आव्हान असताना शेतकऱ्यांनी अन्नधान्य उत्पादनाचा विक्रम केला. अर्थव्यवस्थेला आधार दिला. तर सरकारही दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदीचा विक्रम करत आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक गव्हाची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांना आधार देत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...