नांदेड, परभणी, हिंगोलीत ९३ सौर कृषिपंप कार्यान्वित

नांदेड, परभणी, हिंगोलीत ९३ सौर कृषिपंप कार्यान्वित
नांदेड, परभणी, हिंगोलीत ९३ सौर कृषिपंप कार्यान्वित

नांदेड : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गंत महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन स्रोतांच्या ठिकाणी आजवर ९३ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला चालना देण्याच्या सोबतच शेतकऱ्यांच्या शेतावरील विहिरी, कूपनलिका, शेततळे, कालवा आदी सिंचन स्रोतांतून पाण्याचा उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या कृषिपंपाना दिवसाच्या वेळी अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविली जात आहेत.

या योजनेंतर्गंत शाश्वत जलस्रोत आहेत; परंतु सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजजोडणी नाही. महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरून वीज जोडणी प्रलंबित आहेत, अशा राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर गरजू शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले.

महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण २९ हजार ८७४ अर्ज केले आहेत. त्यापैकी १५ हजार ६८२ अर्ज अवैध ठरले. तीन जिल्ह्यातील वैध अर्जांपैकी एकूण ९ हजार ३६१ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप बसविण्यासाठी दरपत्रक देण्यात आले. त्यापैकी गुरुवार (ता.२५) पर्यंत या तीन जिल्ह्यातील ९३ शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचनस्त्रोतांच्या ठिकाणी सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

नांदेड परिमंडळातील सौर कृषिपंप स्थिती

जिल्हा प्राप्त अर्ज अवैध अर्ज दरपत्रकधारक कार्यान्वित पंप
नांदेड ६५४१ २८४६  ३३३६ १४
परभणी  ८८५१ ३३६२  ४७८९ १३
हिंगोली १४४८२  ९४७४ १२३६  ६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com