आंबेगावातील १९ गावांना मिळणार ‘डिंभे’चे पाणी

डिंभे धरणात साडेतेरा टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी आदिवाशी धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहा टक्के पाणीसाठा आरक्षित आहे. यात कमळजाई उपसा सिंचन योजनेसाठी व बोरघर, फुलवडे, गोहे बुद्रुक या गावांतील शेतीसाठी पाणी उपसा योजनेसाठी ०.६० टीएमसी पाणी आवश्यक आहे. यामुळे सुमारे साडेपाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर सुमारे दीड हजार एकराहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येईल. - सुभाष मोरमारे, माजी सभापती, समाजकल्याण विभाग, पंचायत समिती, आंबेगाव
19 villages in Ambegaon will get 'dimbhe' water
19 villages in Ambegaon will get 'dimbhe' water

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डिंभे धरणाच्या कमळजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या आदिवासी भागातील तब्बल १९ गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तसेच शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.  

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे १९ गावांना कमळजाई उपसा सिंचन योजनांद्वारे डिंभे धरणातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील व कामगार उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर झाला.

सर्वेक्षणाचे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे रविवारी (ता. ९) बैठक झाली. या वेळी आमदार रोहित पवार, जलसंपदा सचिव खलील अन्सारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, उपसभापती सलीम तांबोळी, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, उपाध्यक्ष मारुती केंगले, शांताराम लोहकरे, अशोक शेंगाळे उपस्थित होते.

या गावांना मिळेल पाणी

राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, मेघोली, तळेघर, फलोदे, राजपूर, म्हातारबाची वाडी, नांदूरकिचीवाडी, तेरूंगण, निगडाळे, गोहे खुर्द, कोंढवळ, कोलतावडे, कळंबई, गोहे बुद्रुक, बोरघर, फुलवडे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com