जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला पसंती

जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांना जवळपास ५५० एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे.
190 farmers prefer bamboo in Jalna district
190 farmers prefer bamboo in Jalna district

जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांना जवळपास ५५० एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या माध्यमातून गत तीन वर्षांपासून पिकाच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण, चर्चासत्रे व अभ्यास दौरे घेण्यात आले. बांबू समन्वयक भालेकर यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळाले.

बांबूच्या जातींचा अभ्यास करण्यासाठी ‘केव्हिके’च्या प्रक्षेत्रावर विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी लावलेला बांबू पुढच्या वर्षी तोडणीस येईल. या वर्षी अतिवृष्टी होऊन सुद्धा बांबू पीक उभे आहे. नुकसान झालेले नाही. खऱ्या अर्थाने हवामान पूरक पीक म्हणून बांबूचे पीक पुढे आले आहे. ‘केव्हिके’च्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून बांबूचे उत्पादन सुरू होते.

जवळपास २०० रोपे लागवडीसाठी लागतात. ‘पाच बाय चार मीटर’ अंतरावर लागवड केलेल्या बांबूचे जवळपास ३५ ते ४० वर्षापर्यंत उत्पादन मिळू शकते. एका एकरातून १५०० ते २००० बांबूंचे उत्पादन शक्य आहे. जवळपास ३ हजार ५०० रुपये प्रति टन आला.

एका एकरातून ४३.७५ टन बांबूचे उत्पादन घेणे शक्य आहे. त्यामुळे एकरी १ लाख ५३ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न व खर्च वजा जाता ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न मिळणे शक्य  आहे. त्यामुळे शासनाच्या बांबू मिशनचे व केव्हीके खरपुडीचे तज्ज्ञांनी सांगितले.

जवळपास अडीच वर्षापूर्वी सहा एकरावर बांबूची लागवड केली. कंपनीशी करार करून केलेल्या या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पन्नाची हमी आहे. शिवाय बाजारभाव, दुष्काळ, मजुरांची उपलब्धता हा प्रश्न नाही. आपल्यासोबतच इतरही दोन शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५ एकरावर लागवड केली. - गणेश अंभोरे, बांबू उत्पादक शेतकरी, शेलगाव

जवळपास तीन वर्षांपासून ‘केव्हिके’द्वारे हवामान पूरक बांबू पीक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक समस्यांना  निकाली काढण्याचे काम बांबू करतो. त्यामुळे रेशीम सोबतच बांबूचा ही स्वीकार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. - एस. व्ही. सोनुने, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, खरपुडी, जि. जालना

      बांबूची वैशिष्ट्ये

  • पडीक जमीन, शेताचे बांध, क्षारपड जमिनीत उत्पादन शक्य
  •  अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोगाची समस्या नाही
  •  पर्यावरण स्नेही, भविष्यात लाकूड, प्लॅस्टिकला पर्याय
  •  प्रक्रिया उद्योगामुळे, तंत्रज्ञानामुळे रोजगारात वाढ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com