उत्तर भारतात पुरामुळे यंदा १९०० जणांचा मृत्यू

समुद्रात वाढत्या वादळे आणि चक्रीवादळांचा एकत्रित परिणाम लाखो लोकांना प्रभावित करणारे फणी वादळ हे हवामान बदलाच्या परिणामांचा एक इशारा आहे. - मिशेल मान, हवामान शास्त्रज्ञ
flood
flood

नवी दिल्ली: देशात यंदा हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींच्या साखळीचाच सामना करावा लागला आहे. यात पुरामुळे उत्तर भारतात आलेल्या पुरांमुळे १९०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३४ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले, अशी माहिती युके येथील ख्रिश्‍चन एड या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली.  ख्रिश्‍चन एड ही युके येथील एक धर्मदाय संस्था आहे. या संस्थेने शुक्रवारी (ता. २७) जागतिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे, की फणी वादळासारख्या हवामानविषयक प्रभावी घटनांनी एक हजार कोटींचे नुकसान केले आहे. तर, एक कोटीपेक्षा अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. उत्तर भारतात यंदा पुरामुळे १९०० जणांचा मृत्यू झाला आहे. फणी वादळामुळे देशभरात जवळपास ३४ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. एक कोटीपेक्षा अधिक झाले वादळामुळे उन्मळून पडली. फणी वादळ हे देशातील मागील २० वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली वादळ होते. हे वादळ २ ते ४ मे २०१९ च्या दरम्यान भारत आणि बांगलादेशला धडकले. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते तर दीड मीटर उंचीच्या लाटा वाहत होत्या.  आशियात मे आणि जून या दोन महिन्यांत दोन हजार ८०० कोटींचे नुकसान झाले. फणी वादळाने भारत आणि बांगलदेशात थैमान घातले. तर चीनमध्ये मागील ६० वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला. उत्तर भारतात सरासरी मॉन्सूनपेक्षा अधिक पाऊस झाला. पुरामुळे १९०० जणांना आपला जीव गमावावा लागला.  ओडिशाला सर्वाधिक फटका फणी वादळाचा ओडिशा राज्याला सर्वाधिक फटका बसला. वादळामुळे झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील ८९ जणांचा मृत्यू झाला. दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. लाखो घरांचे नुकसान झाले. तसेच, पशुधानही पुरात अनेक ठिकाणी वाहून गेले.   हा केवळ इशाराः मान हवामान शास्त्रज्ञ मिशेल मान म्हणाले, की भारतात आलेले हे वादळ केवळ हवामान बदलाचा इशारा आहे. समुद्रातील वाढते वादळे आणि चक्रीवादळामुळे फणी वादळासारखी घटना घडली. ज्वलंत इंधनांचा वापर आणि वातावरणात कार्बन वायू उत्सर्जन होत राहिल्यास पृथ्वी हा ग्रह अधिक उष्ण होईल आणि या घटना घडण्याचे प्रमाण वाढेल. पावसातील अनिश्‍चितता वाढेल हरितगृह वायू उत्सर्जन कमी न झाल्यास त्याचा काय परिणाम होईल याचा इशारा शास्त्रज्ञांनी या आधीच दिला आहे. सध्या भारतात अचानक होणारी अतिवृष्टी आणि ढगफुटी शास्त्रज्ञांचा इशारा खरा ठरत असल्याचे दर्शवीत आहे. आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे, की हरितगृह वायू उत्सर्जन वाढतच राहिल्यास मॉन्सूनच्या काळात पडणारा पाऊस अधिकच अनिश्‍चित होईल आणि देशातील पावसातील अनिश्‍चितता ५० टक्क्यांनी वाढेल. तापमान एक डिग्रीने अधिक उष्ण जगभरात घडत असलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांना हवामान बदल जबाबदार आहे. वातावरण उष्ण झाल्यास अधिक पाण्याचे बाष्प होते आणि जास्त पाऊस, अतिवृष्टी अशा घटना घडतात. जागतिक तापमान औद्योगिक युगाच्या तुलनेत एक डिग्री सेल्सिअसने वाढले आहे आणि जगात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. उत्तर भारतात वादळी पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे आणि त्याची तीव्रता ८० टक्क्यांनी वाढली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.  काय म्हटले अहवालात

  •   शास्त्रज्ञांचा इशारा खरा ठरतोय 
  •   हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले
  •   फणी २० वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली वादळ ठरले 
  •   भारत, बांगलदेश आणि चीनला फटका
  •   औद्योगिकपूर्व काळापेक्षा तापमानात एक डिग्रीने वाढ
  •   उत्तर भारतात वादळी पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले
  •   फणी वादळ हा केवळ इशारा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com