`जलयुक्त`अभियानाअंतर्गत १९४३ कामांचा आराखडा

`जलयुक्त` अभियानाअंतर्गत १९४३ कामांचा आराखडा
`जलयुक्त` अभियानाअंतर्गत १९४३ कामांचा आराखडा

परभणी ः जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवड झालेल्या १०५ गावशिवारात करावयाच्या जलसंधारणाच्या विविध प्रकारच्या १ हजार ९४५ कामांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या कामांसाठी ३६ कोटी २७ लाख रुपये निधी आवश्यक आहे.

टंचाईमुक्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या वर्षी २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १०५ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावात ग्राम समित्यांनी शिवार फेरीच्या माध्यमातून कामांच्या जागा निश्चित करून आराखडा तयार केला. जिल्हास्तरीय समितीने या आराखड्यास नुकतीच मंजुरी दिली.

निवड झालेल्या १०५ गावांच्या शिवारात १९ हजार ७४२.२२ हेक्टरवर ढाळीचे बांधाची कामे केली जाणार आहेत. ३३ ठिकाणी खोल सलग समतळ चर, ४८८ शेततळी, ३२६ नाला खोलीकरण, ५ माती नालाबांध, ४१ ठिकाणी वृक्ष लागवड, ५३ गॅबियन बंधारे, ६१ साखळी सिमेंट बंधारे, २९ जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन, ८ अस्तित्वातील लघुपाट बंधारे संरचनांची दुरुस्ती २०१ विहिरी, बोअरचे पूनर्भरण, ३१० ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आदी कामांचा आराखड्यामध्ये समावेश आहे. ६१ साखळी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये परभणी, पूर्णा तालुक्यात प्रत्येकी ३, जिंतूरमध्ये १५, सेलूमध्ये १०, पाथरी तालुक्यात ८, सोनपेठ तालुक्यात २, पालम तालुक्यात ४, गंगाखेड तालुक्यात १६ बंधाऱ्यांची कामांचा समावेश आहे. ४४० शेततळ्यांमध्ये परभणी, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी २५, जिंतूर तालुक्यातील १५४, सेलू तालुक्यातील ३९, मानवत तालुक्यातील ५२, सोनपेठ तालुक्यातील १०, गंगाखेड तालुक्यातील १४, पालम तालुक्यातील १० आणि पूर्णा तालुक्यातील २५ शेततळ्यांचा समावेश आहे.

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी ३१० रिचार्ज शाफ्ट घेण्यात येणार आहेत. यामध्ये परभणी तालुक्यातील ३५, जिंतूरमधील ९५, सेलूमधील ५०, मानवतमधील २०, पाथरीमधील १०, गंगाखेडमधील ४०, पालममधील ३०, पूर्णा तालुक्यातील ३० रिचार्ज शाफ्टचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com