भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेतून वगळले

मंगळवेढा, जि. सोलापूर ः आता पुन्हा एकदा भोसे आणि मरवडे या मंडळांतील १९६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळल्याचा प्रकार घडला आहे.
196 grapes from Bhose, Marwade mandals Manufacturers excluded from the insurance plan
196 grapes from Bhose, Marwade mandals Manufacturers excluded from the insurance plan

मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील डाळिंब पिकाची भरपाई देताना तालुक्यातील तीन महसूल मंडळे वगळण्याची घटना ताजी आहे. तोच आता पुन्हा एकदा भोसे आणि मरवडे या मंडळांतील १९६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळल्याचा प्रकार घडला आहे.

या विमा योजनेसाठी तालुक्यातील डाळिंब, द्राक्षे, आंबा, लिंबू या पिकांचा विमा भरला. परंतु, २०१९ चा फळपीक विमा मंजूर करताना तालुक्यात विविध मंडलांमध्ये पडलेल्या पावसाच्या नोंदीवरून डाळिंब पिकाचा विमा मंजूर करताना मरवडे, मंगळवेढा, भोसे तीन महसूल मंडळातील ४७०० शेतकरी वगळण्यात आले.

याबाबत या मंडळातील शेतकऱ्यांमधून विमा कंपनीच्या दुजाभाव करण्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात होता. तोच आता गेल्यावर्षीच्याच द्राक्ष पिकाच्या विम्यातून मरवडे आणि भोसे या दोन महसूल मंडलातील १९६ द्राक्ष उत्पादकांना विम्याच्या लाभातून वगळले आहे. 

द्राक्ष पिकाचा विमा मंजूर करताना देखील तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये वेगवेगळी रक्कम मंजूर केली. विमा कंपनी ही स्वतंत्र असताना शेतकऱ्याला विमा भरपाई देण्याबाबत महसूल मंडळांतील तहसीलकडील पावसाची आकडेवारी व महावेधची आकडेवारी यामध्ये योग्य समन्वय साधून सर्वच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ठराविक भाग निवडून तेवढ्याच शेतकऱ्यांना लाभ दिला जातो आहे. हा दुजाभाव दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

हवामानाच्या लहरीपणामुळे द्राक्षाला कायम फटका बसतो. पिकाला जोखीम मिळावी म्हणून विमा भरला. परंतु, चुकीचे निकष लावून भरपाईपासून वंचित ठेवल्याने भविष्यात विमा भरावयाचा का नाही, हा प्रश्न आहे. - श्‍यामराव थोरबोले, द्राक्ष उत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com