उमेदवारांसाठी १९८ मुक्त चिन्हे उपलब्ध

एव्हीएम
एव्हीएम

मुंबई: लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांतील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (निशाणी) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ (फ्री सिम्बॉल्स) घोषित करण्यात आली असून, त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो. या चिन्हांमध्ये शेती आणि शेतकऱ्याला मान देणाऱ्या चिन्हांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी, नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश असून एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७ मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करून या वर्षी १९८ मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते. दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रांतील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करून आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करून आयोगाने एकप्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे. गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, रेफ्रिजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्राइंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फुलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रूपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे. यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते; तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धिबळ पट, कॅरम बोर्ड, फूटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टिक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने; तसेच क्रिकेट फलंदाज, फुटबॉल खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रांतील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.

मुक्त चिन्हांमध्ये नव्या-जुन्यांचा मिलाफ जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्यांचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.

व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थान  आपल्याला सकाळी उठल्यापर्यंत लागणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्टपासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com