परभणी : कृषी, पशुसंवर्धन, लघू सिंचनासाठी सव्वादोन कोटी

2. 38 Crore for Agriculture, Animal Husbandry, Short Irrigation in Parbhani
2. 38 Crore for Agriculture, Animal Husbandry, Short Irrigation in Parbhani

परभणी : परभणी जिल्हा परिषदेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी, पशुसंवर्धन, लघू सिंचन या कृषी संलग्न विभागांतर्गत विविध घटकांसाठी २ कोटी ३८ लाख ३ हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता. १३) झालेल्या सर्वसाधारण सभेत २१ कोटी ७ लाख ८५ हजार १६६ रुपये महसुली खर्चासह १ लाख १८ हजार ७२८ रुपये एवढ्या शिलकीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १३) दुपारी सर्वसाधारण सभा झाली. उपाध्यक्ष, अर्थसभापती अजय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., सभापती रामराव उबाळे, मीरा टेंगसे, शोभा घाटगे, अंजली आणेराव, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा कापसे आदी उपस्थित होते.

चौधरी यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण अपेक्षित महसुली जमा आरंभीच्या शिलकीसह २१ कोटी ९ लाख ३ हजार ८९४ रुपये आणि एकूण अपेक्षित महसुली खर्च २१ कोटी ७ लाख ८५ हजार १६६ रुपये विचारात घेऊन १ लाख १८ हजार ७२८ रुपये शिलकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले.

जिल्हा परिषदेच्या सन २०१९-२० चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन २०२० ०२१ चे मूळ अंदाजपत्रकीय उत्पन्नातून सर्व विभागांना त्यांच्या मागणी, गरजा, जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न लक्षात घेऊन तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना मनुष्यचलित, बैलचलित कृषी औजारे, ट्रॅक्टर, इंजिन पंप, पावर स्प्रे, ताडपत्री, कडबा कटर, पाइप, विद्युत पंप, कृषी अभ्यास दौरा, स्पायरल सेपरेटर आदी साधनाचा पुरवठ्यासाठी ९१ लाख २ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली.  

जनावरांचे साथ रोग नियंत्रण, श्वानदंश लस खरेदी, पशुचिकित्सालय दुरुस्ती आदीसाठी ८० लाख रुपये, कोल्हापुरी बंधारे खोलीकरण, दरवाजे दुरुस्ती आदीसाठी ६७ लाख १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.

  कृषीसाठी ५८ लाखांची वाढ

कृषी व संलग्न विभागासाठी गतवर्षीपेक्षा यंदा ५८ लाख ५४ हजार ३५३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी १ कोटी २ लाख २१ हजार रुपये, आरोग्य विभाग १ कोटी १ हजार रुपये, समाजकल्याण विभाग १ कोटी ७८ लाख ७१ हजार १५६ रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी ९६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com