नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन लाख ७८ हजार क्विंटल कापूस खरेदी

2 lakh 78 thousand quintals cotton purchase in Nanded, Parbhani, Hingoli Districts
2 lakh 78 thousand quintals cotton purchase in Nanded, Parbhani, Hingoli Districts

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात सोमवार(ता. ९)पर्यंत राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापाऱ्यांची एकूण २ लाख ७८ हजार ८३८ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये महासंघाकडून २८ हजार ७४३.१५ क्विंटल, ‘सीसीआय’तर्फे ५१ हजार ३६४ क्विंटल, खासगी व्यापाऱ्यांकडून १ लाख ९८ हजार ७३१ क्विंटल एवढी कापूस खरेदी झाली.

खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा पणन महासंघाच्या कापूस खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. या तीन जिल्ह्यांत महासंघाची एकूण पाच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील पणन महासंघाच्या भोकर आणि तामसा येथील केंद्रावर २८२ शेतकऱ्यांचा ५ हजार ८७०.४५ क्विंटल, ‘सीसीआय’तर्फे नांदेड, नायगाव, कुंटूर येथील केंद्रांवर ३ हजार ७५ क्विंटल, भोकर आणि धर्माबाद येथे ५७ हजार ६३६ क्विंटल, जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय, खासगी अशी एकूण ६६ हजार ५८१ क्विंटल कापूस खरेदी झाली.

परभणी जिल्ह्यात पणन महासंघाकडून पाथरी आणि गंगाखेड येथील केंद्रांवर ८३१ शेतकऱ्यांचा २२ हजार ८७२.७० क्विंटल कापूस खरेदी झाला.

बाभळगाव (ता. पाथरी) येथील खरेदी केंद्रावरील जिनिंग फॅक्टरीमध्ये बिघाड झाल्यामुळे तेथील कापूस खरेदी बंद झाली. पाथरी येथील एका जिनिंग फॅक्टरीमध्ये खरेदी सुरू करण्यात करण्यात आली आहे, असे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके यांनी सांगितले.

‘सीसीआय’तर्फे सेलू, मानवत, जिंतूर, पूर्णा, ताडकळस येथील ४२ हजार ८५९ क्विंटल, परभणी, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, जिंतूर बाजार समित्यांतर्गंत १ लाख ३९ हजार २०५ क्विंटल, जिल्ह्यात एकूण २ लाख ४ हजार ६९६ क्विंटल कापूस खरेदी झाली. 

हिंगोली जिल्ह्यात महासंघातर्फे १४ शेतकऱ्यांचा २४०.२० क्विंटल, ‘सीसीआय''कडून हिमायतनगर आणि जवळा बाजार येथील केंद्रावर ५ हजार ७६० क्विंटल, हिंगोली, आखाडा बाळापूर, जवळा बाजार येथे खासगी व्यापाऱ्यांकडून १ हजार ८९४ क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यात एकूण ७ हजार ६६८ क्विंटल कापूस खरेदी झाली. त्यास प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. 

पणन महासंघाची कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा  खरेदी केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ५८७०.४५ २८२
परभणी २२६३२ ८३१
हिंगोली २४०.२० १४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com