नाशिक परिमंडलात थकबाकीमुक्तीत २ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

नाशिक : कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे उपलब्ध आहे. नाशिक परिमंडलातील २ लाख ७६ हजार ६३४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
2 lakh farmers participate in arrears relief in Nashik circle
2 lakh farmers participate in arrears relief in Nashik circle

नाशिक : कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे उपलब्ध आहे. नाशिक परिमंडलातील २ लाख ७६ हजार ६३४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.  

वीजबिलांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत नाशिक परिमंडलातील २ लाख ७६ हजार ६३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे.

यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलापोटी २६८ कोटी ६७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ४३६ ग्राहकांनी १६३ कोटी १७ लाख, तर नगर जिल्ह्यातील १ लाख ५० हजार १९८ ग्राहकांनी १०५ कोटी ५० लाख रुपये वीजबिल भरले. या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट, विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे. 

नाशिक परिमंडळात ४२ हजार ३०६ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यात ३३ हजार ३९२, तर नगर जिल्ह्यातील ८ हजार ९१४ ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

नाशिक परिमंडलातील ७ लाख ४४ हजार ७१० शेतकऱ्यांकडे एकूण ८०६४ कोटी २२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ५,६५२ कोटी ५९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी २८२६ कोटी २९ लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होईल. या ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे, चालू वीजबिलाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com