agriculture news in marathi, 20 buildings of Zilla Parishad schools are dangerous | Agrowon

जळगाव जिल्हा परिषद शाळांच्या २० इमारती धोकादायक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मार्च 2019

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे २० इमारती धोकादायक स्थितीत आहेत. येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत या शाळांचे पाडकाम करून संबंधित इमारतींचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यात कळमडू, बहाळ, यावलमध्ये साकळी, कोरपावली, चोपड्यात अडावद, मंगरूळ, जळगावात कानळदा, म्हसावद आदी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, छप्परांची अवस्था दयनीय आहे. कळमडू येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ती तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे २० इमारती धोकादायक स्थितीत आहेत. येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत या शाळांचे पाडकाम करून संबंधित इमारतींचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यात कळमडू, बहाळ, यावलमध्ये साकळी, कोरपावली, चोपड्यात अडावद, मंगरूळ, जळगावात कानळदा, म्हसावद आदी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, छप्परांची अवस्था दयनीय आहे. कळमडू येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ती तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

कळमडू येथील शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळेत गावातील शंभरच्यावर मुले -मुली शिक्षण घेतात. कौलारू छपराची ही इमारत जीर्ण झाली आहे. 

कळमडू येथील रहिवासी संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या ‘आपले सरकार'' या पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तिची दखल घेऊन २८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली. ही शाळा निर्लेखित करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. 

अनेक जणांना ‘आपले सरकार‘ पोर्टलवर तक्रार दाखल करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडे तक्रार केल्यास राजकारण सुरू होते. एक गट दुसऱ्या गटाचे काम मार्गी लागू देत नाही. अशात शाळांच्या इमारतींकडे दुर्लक्ष झाले. काही इमारतींना पाडण्याची गरज नाही. केवळ छप्पराची दुरुस्ती केली, तरी पुढील १० ते १५ वर्षे इमारत सुस्थितीत राहतील. काही ठिकाणी इमारतीचे लाकडी खांब वाकल्याची स्थिती आहे. 


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...