लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी केंद्रे मंजूर

लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी केंद्रे मंजूर
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी केंद्रे मंजूर

लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी दराने तूर खरेदीसाठी २० केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी दहा केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर ७८८४ शेतकऱ्यांनी हमी दराने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सातबारावर तुरीचा पेरा अद्ययावत नसल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीत अडचण येत असल्याची स्थिती आहे. 

लातूर जिल्ह्यात यंदा तूर खरेदीसाठी उदगीरमधील दोन केंद्रासह दहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रावरून ७५७८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये अहमदपूर येथील केंद्रावर ८९७, हलसी तुगाव २४८, औसा ९८२, भोपणी ६९८, चाकूर १७७०, लातूर १८१, लोणी उदगीर ३८९, रेणापूर ६१९, शिरूर अनंतपाळ २७१ व उदगीर केंद्रावरील १५२३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात दहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या केंद्रावरून ३०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या केंद्रांमध्ये उस्मानाबाद, नळदूर्ग, भूम, वाशी, लोहारा, गुंजोटी, कानेगाव, ढोकी, तुळजापूर, कळंब या केंद्रांचा समावेश आहे. या पैकी उस्मानाबाद केंद्रावर ७६, भूम ७१, गुंजोटी १२९, ढोकी ६, तर कळंब केंद्रावरून २४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असला तरी, प्रत्यक्षात तलाठ्यांकडून सातबारा उताऱ्यावर हंगाम २०१९-२० चार तूर पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. १ जानेवारीपासून सुरू झालेली नोंदणी १४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 

हमीभाव ५८००, मात्र खरेदी पाच हजारांच्या आताच

तुरीचा जाहीर हमी दर ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल आहे. प्रत्यक्षात लातूर जिल्ह्यात सरासरी ५ हजाराच्या आतच तुरीची खरेदी होते आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असताना व शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने तूर विकण्याची वेळ आली आहे. हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी कधी आदेश दिले जाणार, असा प्रश् ‍नशेतकऱ्यांना पडला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com