अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी

अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी
अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी

सोलापूर : अक्कलकोट नगर परिषदेच्या इमारत बांधकामासाठी १३ कोटी, भाविकांच्या कार पार्किंगसाठी ३ कोटी, स्वच्छतागृह बांधकामांसाठी ३ कोटी रुपये आणि गार्डन विकासासाठी १ कोटी रुपये असे एकूण २० कोटी रुपये नगरविकास विभागाला दिले जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा अर्थमंत्र्यांनी नुकताच मुंबईत घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करावा. पालखी मार्ग मोठा करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधून रस्ता रुंदीकरणासाठी जागा घ्याव्या.’’

‘‘अक्कलकोट तीर्थक्षेत्राला वर्षभर भाविक भेट देत असतात, हे लक्षात घेऊन येथील पाणीपुरवठा शाश्वत करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोताचा शोध घेण्यात येईल. पाणीपुरवठा मंत्री या संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेऊन योजनेची निश्‍चिती करतील. त्यानंतर त्यास आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. भूमिगत नाले आणि वीज वाहिन्यांच्या कामासाठी जीवन प्राधिकरण आणि ऊर्जा विभागाचे सहकार्य घेण्यात यावे. हे काम झाल्याशिवाय रस्त्यांची कामे केली जाऊ नयेत,’’ असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

अक्कलकोटचे बस स्टॅंड एसटी महामंडळाने त्यांच्या बस स्थानकांच्या नूतनीकरण कार्यक्रमात समाविष्ट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी १६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील कामाचे प्राधान्यक्रम निश्‍चित केले जावेत, असेही अर्थमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com