agriculture news in Marathi 20 crore distributed of farm pond subsidy Maharashtra | Agrowon

शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 मे 2021

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. 

नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. मात्र कामे बंद होण्याअगोदर मंजुरी मिळाल्यानंतर कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने २० कोटींचा निधी वितरित केला आहे. पाच वर्षात राज्य शासनाने शेततळ्याची १ लाख १२ हजार ३११ कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५९० कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील अनेकांना कामे करूनही अनुदान मिळाले नाही. 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घ्यावे यासाठी शासनाच्या कृषी विभागाने सुरू केलेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजना दुष्काळी भागासाठी अत्यंत लाभदायक ठरली असल्याचा अनुभव आहे. एका शेतकऱ्याला शासन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान देते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने स्थगित केली आहे. मात्र त्याआधी मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश दिले. नंतर ती शेततळी शेतकरी शेतकऱ्यांनी पूर्ण केली. मात्र त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. 

२०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यामध्ये अनुदानापोटी ६३६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात आता वीस कोटीची भर पडली आहे. या वर्षी कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरून आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना अनुदान व कंत्राटी कामगार मानधानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार २० कोटी नुकतेच प्राप्त झाले असून, ती रक्कम जिल्हास्तरावर वितरित केली आहे. 

वितरित केलेल्या निधीत कोकण विभागाला २९ लाख ७७ हजार, नाशिक विभागाला ६७ लाख ५७ हजार, पुणे विभागाला ९ कोटी ९१ लाख, कोल्हापूर विभागाला २ कोटी ६१ लाख, औरंगाबाद विभागाला २ कोटी ७२ लाख, लातूर विभागाला ९९ लाख ५० हजार, अमरावती विभागाला ३३ लाख व नागपूर विभागाला २ कोटी ३० लाख रुपये वितरित केले आहेत.

गेल्या वर्षभरापासून शेततळ्याची कामे बंद असली तरी अजूनही अनेकांना अनुदान मिळाले नाही. राज्यात आतापर्यंत नगर जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ९ कामे पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात १४ हजार २९१, सोलापूर जिल्ह्यात १२ हजार ४७०, नाशिक जिल्ह्यात १० हजार ३८१ कामे पूर्ण झाली आहेत. 

राज्यातील शेततळ्याची आतापर्यंतची स्थिती 
एकूण उद्दिष्ट ः
१ लाख १२ हजार ३११ 
प्राप्त अर्ज ः ४ लाख ५७ हजार ५२१ 
पात्र शेतकरी ः ४ लाख २ हजार ६४२ 
कामे पूर्ण झालेली शेततळे ः १ लाख ४९ हजार ५९० 
आतापर्यंत खर्च ः ६५६ कोटी (नुकतेच २० कोटी प्राप्त) 

पाच वर्षांतील पूर्ण झालेली कामे 
कोकण विभाग ः
१८१७
नाशिक विभाग ः १३९३४
पुणे विभाग ः ३३८६७
कोल्‍हापुर विभाग ः ११२६५
औरंगाबाद विभाग ः ३३८०७
लातुर विभाग ः १६३३७
अमरावती ः २२,७४७
नागपूर विभाग ः १५८१६. 


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...