agriculture news in Marathi 20 lac ton sugar export contract from state Maharashtra | Agrowon

राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार 

राजकुमार चौगुले
सोमवार, 22 मार्च 2021

यंदा साखर उत्पादनाबरोबरच महाराष्ट्राने साखरनिर्यातीतही आघाडी घेतली आहे. देशातून ४४ लाख टन साखरेचे निर्यात करार झाले आहेत.

कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच महाराष्ट्राने साखरनिर्यातीतही आघाडी घेतली आहे. देशातून ४४ लाख टन साखरेचे निर्यात करार झाले आहेत. यापैकी सुमारे वीस लाख टन साखरचे करार एकट्या महाराष्ट्रातून झाले आहेत. राज्यातील कारखान्यांना कोटा अदला बदल सवलत चांगलीच फलदायी झाल्याचे चित्र मार्चमध्येही आहे. या सवलतीमुळे गेल्या एक महिन्यात राज्यातील कारखान्यांनी पाच लाख टनांचे निर्यात करार नव्याने केले आहेत. 

कंटेनर उपलब्धता व वाहतूक भाडेवाढीची समस्या अद्यापही कायम आहे. तरीही कारखान्यांनी राज्यातील कारखान्यांसाठी निर्यातीसाठी उचललेली पावले निश्‍चितपणे साखरेचा दबाव कमी करण्यासाठी फलदायी ठरण्याची शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे. साखरनिर्यात धोरण उशिरा जाहीर होऊनही निर्यात करार जलदगतीने होत आहेत. 

यंदा साखरनिर्यात योजना उशिरा जाहीर झाली. यामुळे निर्यातीचे करार मंदगतीने होतील अशी शक्‍यता होती. पण बाहेरील देशांकडून मागणी कायम असल्याने देशभरातील कारखान्यांनी निर्यातीला पसंती दिली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेला क्विंटलला सरासरी २६०० रुपये तर पांढऱ्या साखरेला २७०० रुपये इतका दर आहे. दरात विशेष वाढ नसली, तरी केंद्राने दिलेल्या अनुदानाचा विचार केल्यास साखरेचे दर देशातील साखर कारखान्यांना परवडू शकतात. यामुळेच कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. 

केंद्राने या योजनेत लवचिक बदल करताना स्थानिक व निर्यातीचे कोटे कारखान्यांना अदलाबदल करण्याची मुभा दिली. याचा फायदा कारखान्यांनाही होत असल्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रातील निर्यात करू इच्छिणाऱ्या कारखान्यांनी इतर कारखान्यांचे निर्यात कोटे स्वत: घेत सुमारे पाच लाख टनांचे साखर निर्यात करार केले. थर्ड पार्टी करारही होत असल्याने यंदा राज्यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा साखर निर्यात होण्याची शक्‍यता वाढली आहे. 

निर्यात कोटे अदलाबदल सवलतीचा उपयोग करून देशातून ६ लाख ३२ हजार टनांचे निर्यात करार झाले. यापैकी एकट्या महाराष्ट्रातून ५ लाख टनांचे करार झाले आहेत. केंद्राने निर्यात धोरण जाहीर करताना एकूण साठ लाख टन साखरेचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ४४ लाख टन साखरेचे करार मार्च मध्यापर्यंत झाले आहेत. या पैकी २० लाख टन साखरेचे करार महाराष्ट्रातून झाले आहेत. 

प्रतिक्रिया
राज्यातील कारखाने निर्यातीसाठी आश्‍वासक प्रयत्न करतानाचे चित्र यंदाच्या हंगामात आहे. साखर निर्यात योजनेत कारखान्यांमध्ये स्थानिक व निर्यातीसाठी कोटा अदलाबदलीची सवलत दिल्याने निर्यात करणाऱ्या कारखान्यांना त्याचा लाभ होत आहे. 
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार, कोल्हापूर


इतर अॅग्रोमनी
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...