agriculture news in Marathi 20 paitient recover from corona in Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात वीस कोरोना रुग्ण झाले बरे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

नगर जिल्ह्यात बुधवारी (ता.२२) दोन कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवले असल्याने नगरकरांना दिलासा मिळाला. आतापर्यंत वीस रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगर ः नगर जिल्ह्यात बुधवारी (ता.२२) दोन कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवले असल्याने नगरकरांना दिलासा मिळाला. आतापर्यंत वीस रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असे असताना बुधवारी सायंकाळी पुन्हा जामखेड येथे दोन जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे अहवालातून दिसून आले. त्यामुळे नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ३२ वर गेला आहे.
 
नगर जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची चाहूल लागली. पहिला रुग्ण १२ मार्चला आढळून आला. या परिस्थितीची सतर्कता बाळगून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

बाधित रुग्णांसाठी बूथ हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला. जास्त संख्येने कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेली ठिकाणे हॉट स्पॉट घोषित करण्यात आली. मागील ४० दिवसांच्या कालावधीत जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलिस यंत्रणा अहोरात्र कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सतर्क आहे. 

या कालावधीत जिल्ह्यातील एक लाख ६० हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. बाधित रुग्णांपैकी कोपरगाव येथील महिलेसह श्रीरामपूर व जामखेड येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उर्वरित कोरोनाबाधित आयसोलेशनमध्ये निगराणीखाली आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...