agriculture news in Marathi 20 thousand maximum rate for Onion in Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात कांद्याच्या बाजाराने चांगलीच उसळी घेतली आहे. अगदी नाशिक आणि लासलगावसारख्या बाजारालाही मागे टाकत दराने उच्चांक केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचा हा बाजार चांगलाच तेजीत आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रतिक्विंटलला आठ हजारांवर असणारा दर गुरुवारी (ता. ५) जवळपास अडीच पटीने वाढून प्रतिक्विंटलला सर्वाधिक २० हजार रुपयांवर पोचला. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात कांद्याच्या बाजाराने चांगलीच उसळी घेतली आहे. अगदी नाशिक आणि लासलगावसारख्या बाजारालाही मागे टाकत दराने उच्चांक केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचा हा बाजार चांगलाच तेजीत आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रतिक्विंटलला आठ हजारांवर असणारा दर गुरुवारी (ता. ५) जवळपास अडीच पटीने वाढून प्रतिक्विंटलला सर्वाधिक २० हजार रुपयांवर पोचला. 

व्यापाऱ्यांनी बंद पाडलेल्या लिलावामुळे बाजार समितीमध्ये रोज सकाळी दहा वाजता सुरू होणारे लिलाव गुरुवारी दुपारी एकच्या नंतर सुरू झाले. पण उशिराच्या लिलावाचा कोणताही परिणाम कांद्याच्या दरावर झाला नाही. गुरुवारीही बाजारात कांद्याची आवक २०० हून अधिक गाड्यापर्यंत कायम होती. सध्या कांद्याची आवक स्थानिक भागातून कमी असली, तरी बाहेरील जिल्ह्यातून मात्र अधिक आहे.

अगदी नगर, पुणे, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर, बीड भागातून हा कांदा सोलापूर बाजार समितीत येतो आहे. २१ नोव्हेंबरला बाजार समितीत पहिल्यांदा कांद्याने दराचा उच्चांक केला, तो आठ हजार रुपये, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ नोव्हेंबरला तो ९ हजार १०० रुपयांवर पोचला, तर २५ नोव्हेंबरला ११ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर मात्र १५ हजारांवर कायम राहिला आहे. 

गुरुवारी (ता. ५) मात्र कांद्याच्या या दराने आणखीनच उच्चांक केला. पूर्वीचे सगळ्या दराचे आकडे मोडीत काढत, प्रतिक्विंटलला तब्बल २० हजार रुपये इतक्‍या दराची बोली लागली. राज्यातील दराचा हा उच्चांक आहेच. पण देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दराचा हा उच्चांक मानला जातो आहे. गुरुवारी कांद्याचा किमान दर २०० रुपये आणि सरासरी दर सहा हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. कांद्याला वाढलेली मागणी आणि उपलब्ध आवक यांच्यातील तफावत वाढत असल्याने दरात तेजी राहिल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

व्यापाऱ्याला भरवले पेढे 
यंदा पहिल्यांदाच कांद्याच्या दराने २० हजारांपर्यंतचा उच्चांक केला. हा दर मिळवणारे शेतकरी गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी शिवानंद फुलारी हे ठरले. त्यांनी गुरुवारी व्यापारी अतिक नदाफ यांच्याकडे कांद्याच्या सात गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याच्या त्यांच्या ६ गोण्या (३०९ किलो) होत्या. तर दुसऱ्या प्रतीची एक गोणी होती. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला प्रत्येकी २० हजाराचा दर मिळाला. या सहा गोण्यांचीच ६१ हजार ८०० रुपये इतकी पट्टी त्यांना मिळाली. तर दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला २५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. अशा एकूण सात गोण्यांना त्यांना ६३ हजार रुपये मिळाले. हा दर मिळाल्यानंतर आनंदीत झालेल्या शेतकरी शिवानंद फुलारी यांनी बोली लावणारे व्यापारी नदाफ यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. 
 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...