agriculture news in marathi, 20 TMC water of Ujani reserved for Solapur, other cities | Agrowon

‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य शहरांसाठी राखीव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील २० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातून पिण्याच्या पाणी आरक्षित करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. सोलापूर शहर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ मध्यम आणि ५६ लघुप्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही.

सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील २० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातून पिण्याच्या पाणी आरक्षित करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. सोलापूर शहर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ मध्यम आणि ५६ लघुप्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी न वापरता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उजनी आणि जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत असलेल्या पाणी साठ्याची माहिती दिली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. बैठकीस  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, भीमा कालवा मंडळचे कार्यकारी अभियंता ना. वा. जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजकुमार चंदनशिवे, राज्य वीज वितरण कंपनीचे वि. शं. बच्चे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...