लिंबाला राज्यात प्रतिक्विंटल २०० ते २००० रुपये दर

लिंबाला प्रतिक्विंटल २०० ते २००० रुपये दर
लिंबाला प्रतिक्विंटल २०० ते २००० रुपये दर

पुणे  ः  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) लिंबाची सुमारे दोन हजार गोणी आवक झाली होती. या वेळी गोणीला २०० ते ३०० रुपये दर होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५० रुपयांनी वाढ झाली असून, शिवरात्रीनंतर उसाची रसवंती आणि सरबत व्यवसाय सुरू होतील. त्यानंतर लिंबाची मागणी वाढून दर देखील वाढण्याचा अंदाज आडतदार रोहन जाधव यांनी व्यक्त केला. शिवरात्रीनंतर तापमान वाढायला प्रारंभ होऊन, आवकदेखील कमी होण्याची शक्यता आहे. या वेळी दररोज सुमारे दीड ते दोन हजार गोणींची आवक होऊन, दर प्रतिगोण ४०० रुपयांपर्यंत वाढीचा अंदाज श्री. जाधव यांनी व्यक्त केला. सोलापुरात लिंबाला सर्वाधिक २००० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाची आवक बऱ्यापैकी राहिली. शिवाय मागणी असल्याने उठावही चांगला मिळाला.  प्रतिक्विंटलला सर्वाधिक २००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाची आवक रोज २० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. लिंबाची सर्व आवक ही स्थानिक भागातूनच अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर भागातून झाली. बाहेरील आवक कमीच होती. गेल्या काही दिवसांपासून लिंबाला चांगला उठाव आहे. लिंबाला प्रतिक्विंटलला  किमान ५०० रुपये,  सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. त्या आधीही लिंबाची आवक २० ते ४० क्विंटलपर्यंत होती आणि दर प्रतिक्विंटलला  किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये,  सर्वाधिक १८०० रुपये मिळाला. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही काहीसा दर असाच प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. तर आवक जेमतेम १० ते २० क्विंटलपर्यंत आवक होती. दरातील किरकोळ चढउतार वगळता, दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

औरंगाबादमध्ये लिंबू १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) लिंबाची क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ‘‘औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ जानेवारीला लिंबाची १२ क्विंटल आवक झाली. लिंबाला १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. एक फेब्रुवारीला लिंबाची आवक १३ क्विंटल दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. तीन फेब्रुवारीला नऊ क्‍विंटल आवक झालेली २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ४ फेब्रुवारीला ११ क्विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. पाच फेब्रुवारीला २२ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला,’’ याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. लिंबू दरात कमी आवकेने तेजी नागपूर : गेल्या महिन्यात आवक जास्त असल्याने लिंबू उत्पादकांना दर कमी मिळत होते. आता मात्र, आवक घटल्याने लिंबाच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत लिंबाची आवक गेल्या महिन्यातील १५० क्विंटलवरून गुरुवारी (ता. ६) अवघ्या २० क्विंटलवर पोचली. त्यामुळेच दरही वधारले असून गुरुवारी लिंबाचे व्यवहार २००० ते २५०० रुपये क्विंटलने झाले. १६ जानेवारीला लिंबू ५०० ते १००० रुपये क्विंटल होते. त्यानंतर दर १५०० ते १८०० रुपये १८०० रुपये क्विंटलवर पोचले होते. आता आवक घटल्याने दर थेट २००० ते २५०० रुपयांवर पोचले आहेत. अकोल्यात लिंबू २०० ते ५५० रुपये कट्टा अकोला  ः येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता.६) लिंबाला २०० ते ५५० रुपये प्रतिकट्टा दर मिळाला. लिंबाची १० क्विंटल आवक झाली होती. अकोला बाजारात लिंबाची विक्री कट्टा याप्रकारे केली जाते. एक कट्टा १४ ते १५ किलो वजनाचे असते. यावर्षी लिंबाचा हस्त बहार कमी आलेला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. लिंबाचे अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, या भागात यंदा आवक कमी झाल्याने विजापूर येथून लिंबू आणले जात आहे. गुरुवारी येथे पिवळ्या लिंबाच्या १४ किलो कट्ट्याला २०० रुपये दर भेटला. चांगल्या दर्जाच्या लिंबाला ५०० ते ५५० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात ग्राहकांना लिंबू प्रतिकिलो ४० ते ५० रुपयादरम्यान विक्री केली जात होती. लिंबाला क्विंटलला १००० ते १६०० रुपये दर कोल्हापूर  : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत लिंबाला क्विंटलला १००० ते १६०० रुपये दर मिळत आहे. लिंबाची चारशे ते ५०० पोती आवक होत आहे. बेळगाव बरोबरच स्थानिक भागातूनही लिंबाची आवक होत आहे.  जिल्ह्यात अद्याप फारसा उन्हाळा नाही यामुळे लिंबाची मागणी फार वाढली नाही, आठवड्यातून एक ते दोन दिवस लग्नाचे मुहूर्त असल्याने या कालावधीत लिंबाचे दर वाढत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. त्या पंधरा दिवसात उन्हाळा वाढण्याची शक्यता असल्याने लिंबाचे दरही वाढतील, अशी शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. लिंबाला प्रतिशेकडा ३० ते १०० रुपये दर सांगली  ः ‘‘येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता.६) लिंबाची आवक ३०० पोती (एक पोते २० किलोचे) आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास ३० ते १०० रुपये असा दर मिळाला,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील विजापूर येथून लिंबाची आवक होते. बुधवारी (ता.५) लिंबाची २८० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकडा ३५ ते ११० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ४) लिंबाची ३०० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास ३० ते १०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. ३) लिंबाची ३५० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकडा २५ ते १०० रुपये असा दर होता. नगरमध्ये लिंबाला ४०० ते ५०० रुपयांचा दर  नगर  ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ७० क्विंटल लिंबाची आवक होऊन ४०० ते ५०० व सरासरी साडेचारशे रुपयांचा दर मिळाला.नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवसाला ३० ते ५० क्विंटल लिंबाची आवक होत असून दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे गेल्या महिनाभरात स्थितीवरून दिसून येत आहे. ३० जानेवारी रोजी ६८ क्विंटल आवक होऊन १००० ते अठराशे व सरासरी चौदाशे रुपयांचा दर मिळाला तर २४ जानेवारी रोजी ६० क्विंटल आवक होऊन ६०० ते १२०० व सरासरी नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. १६ जानेवारी रोजी ६८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते तेराशे रुपयाचा व सरासरी ९०० रुपयांचा तर पाच जानेवारी रोजी ५२ क्विंटलच्या वर कोण ५०० ते १००० वर्षासाठी साडेसातशे रुपयांचा दर मिळाला. गेल्या महिनाभराची परिस्थिती पाहता लिंबाच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  नाशिकला लिंबू प्रतिक्विंटल ७५० ते १७५० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता. ५) रोजी लिंबाची आवक ३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १७५० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १२५० रुपये होते. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  मंगळवार (ता. ४) रोजी लिंबाची आवक २८ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. सोमवार (ता. ३) रोजी लिंबाची आवक ३२ क्विंटल झाली. तिला ९०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० होते. शनिवार (ता. १) व शुक्रवार (ता. ३१) रोजी लिंबाची आवक झाली नाही.  गुरुवार (ता. ३०) रोजी लिंबाची आवक ३६ क्विंटल झाली. तिला ५०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लिंबाची आवक सर्वसाधारण असून, आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढउतार दिसून आली. जळगावात १५०० ते ३००० रुपये दर जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) सहा क्विंटल लिंबाची आवक झाली. दरात या आठवड्यात काहीशी सुधारणा झाली असून, गुरुवारी प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. आवक पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. मागील महिन्याच्या मध्यात दरांवर दबाव होता. या आठवड्यात लिंबाची उचल बऱ्यापैकी झाल्याचे सांगण्यात आले.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com