बागलाण तालुक्यात उन्हाळ कांद्याला २०० कोटींचा फटका 

बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाळ कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, गहू, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले.
onion damage
onion damage

नामपूर, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाळ कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, गहू, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार बागलाण तालुक्यात ४ हजार हेक्टरहून अधिक उन्हाळ कांद्याचे क्षेत्र बाधित असून, ५ हजार शेतकरी कुटुंबाचे नुकसान झाले. 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून परिसरातील शेतकरी गारपीट व अवकाळी पावसाला तोंड देत आहेत. यामुळे होणाऱ्या नुकसानीचे शासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याची टीका नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब अहिरे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली. सध्या मोसम खोऱ्यात कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा काढल्यानंतर शेतातच वाळविण्यासाठी ठेवला होता. परंतु गारपीट व पावसाने मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजला.  नामपूर, जायखेडा, खडकीपाडा, लखमापूर, तळवाडे दिगर, दसवेल, एकलहरे, टेम्भे वरचे, द्याने, श्रीपुरवडे, खामलोण, राजपूर पांडे, चिराई, आसखेडा, फोफिर, गोराणे, महड, बहिराणे, बिलपुरी आदी गावांना अवकाळी व गारपीटीचा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितिमुळे यंदा शेती व्यवसायवर दुष्काळाचे सावट आहे. परंतु अवकाळी पावस व गारपीट यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. 

पीकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये) 

पीक बाधित क्षेत्र शेतकरी 
कांदा ४०२० ४८७८ 
भाजीपाला ४२ ३० 
गहू ७० १२५ 

तालुक्यातील नुकसान (हेक्टर)  ४१३२  बाधित क्षेत्र  ५०३३  बाधित शेतकरी  ४७  बाधित गावे  प्रतिक्रिया  तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. वंचित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे केले जातील.  - एस. एस. पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण 

शासनाच्या कृषिविरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरशा पिचून गेला आहे. शेतकरी हितासाठी तातडीने आर्थिक मदत, वीजबील माफी, शेतीमालाला हमीभाव काळाची गरज आहे.  - गुलाबराव कापडणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com