agriculture news in marathi, To 200 farmers in Ambad taluka Supply of 48 MT of fertilizers in the farm | Agrowon

अंबड तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना ४८ मेट्रिक टन खतांचा बांधावर पुरवठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

शेतकऱ्यांनी हव्या असलेल्या खतांची मागणी सबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांमार्फत नोंदवावी. 
- बाळासाहेब शिंदे , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना. 
.... 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग विविध खतांचा पुरवठा करत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते पुरविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हव्या असलेल्या खतांची मागणी कळविल्यास थेट गावात खतांचा पुरवठा करण्यात येईल. 
- भिमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद 

जालना : बांधावर खत पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली आहे. शुक्रवारी (ता.८) अंबड तालुक्यातील पिंपरखेड येथील मत्स्योदरी ॲग्रो प्रोड्युसर कपंनीमार्फत जवळपास २०० शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ४८ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला. 

राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. 

खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. शेत मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने कापूस बियाणे विक्री तुर्तास बंद केली आहे. खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गावात खताचा व बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. एखाद्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांनाही खताचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिली. 

 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...