Agriculture news in marathi 200 hectares of crops hit pre monsoon rain in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात अवकाळीने २०० हेक्टर पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १८ आणि १९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यातीने सुमारे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक फळे आणि कांद्याचे नुकसान झाले आहे.

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १८ आणि १९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यातीने सुमारे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक फळे आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे त्यासंबंधीची प्राथमिक माहिती आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार त्यावर पुढील कार्यवाही होईल, असे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि फळभाज्यांसह आंब्याचेही मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा तालुक्यात प्रामुख्याने हे नुकसान झाले. कृषि विभागाकडून गावस्तरावर नुकसानीच्या पाहणीचे काम सुरु आहे. 

आतापर्यंत सुमारे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही कृषि विभागाच्या अंतिम अहवालानंतर नुकसानीचा नेमका आकडा समजेल, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले. सध्या ‘कोरोना’मुळे आधीच शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रश्नावरुन हतबल झाला आहे. कसे-बसे भाजीपाला, कांदा ही पिके हातविक्री करुन त्यावर मार्ग काढत आहेत. पण, अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले. आता त्याच्या भरपाईतून काही मिळेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...