agriculture news in marathi 200 more beds to be added to Pandharpur: Bharne | Page 3 ||| Agrowon

पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणे

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

सोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे’’, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

सोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे’’, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.  

पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते. 

‘‘पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूहातर्फे अभिजित पाटील यांचे ५० बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये ३० आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ३० बेडची क्षमता वाढवली जाणार आहे’’, असे पालकमंत्री भरणे म्हणाले.  

पंढरपूरला सध्या ६५ एकर परिसरात आणि गजानन महाराज मठात कोविड केअर सेंटर सुरु आहेत. याच बरोबरीने मोठ्या ग्रामपंचायतींना मंजुरी दिली जावी, अशा सूचना भरणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. ‘ब्रेक द चेन’च्या मोहिमेत पोलिस विभागाने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करावी. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, असेही भरणे यांनी पोलिसांना सांगितले. 

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...