ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले : पंतप्रधान मोदी
नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना हाती घेतली. या माध्यमातून संपूर्ण देशभर या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले. यातून देशातील शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला. त्यात महाराष्ट्राचा वाटा १५०० कोटींचा असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी सन्मान योजना असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या नाशिक येथील सांगता सभेत गुरुवारी (ता.२०) ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, की पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील जनता, शेतकरी विकासापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. देशातील पशुपालकांच्या समस्या लक्षात घेऊन देशभरात पशू लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक छोट्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या योजनेत जोडून त्याला मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार, शिक्षण, गुंतवणूक या माध्यमातून देशाची व्यवस्था बळकट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांना पगडी घालून सत्कार केला. तसेच, श्री. फडणवीस यांनी जनतेने भरभरून यात्रेत सहभाग नोंदविल्याबद्दल आभार मानले. तसेच मी राज्याचा भ्रष्ट्राचाराचा डाग पुसून टाकला, असे त्यांनी सांगितले.
- 1 of 1026
- ››