agriculture news in marathi 2005 batch IAS Dheeraj Kumar will be new Agriculture commissioner of Maharashtra | Agrowon

राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार; शेतकरी केंद्रीत काम करणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते आएएस श्रेणीतील महाराष्ट्र केडरच्या २००५ च्या तुकडीतील अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. 

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते आएएस श्रेणीतील महाराष्ट्र केडरच्या २००५ च्या तुकडीतील अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. 

आधीचे आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची बदली झाली होती. श्री.दिवसे यांनी सोमवारी (ता.१३) आयुक्तपदाची सूत्रे सोडली होती. शासनाने कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांना आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे स्वीकारण्याचा आदेश दिला होता. कृषी आयुक्तपदासाठी कायम नियुक्ती न झाल्यामुळे राज्यभर नव्या आयुक्तांबाबत उत्सुकता होती. धीरज कुमार यांच्या नियुक्तीने आता कायमस्वरूपी आयुक्त कृषी विभागाला मिळाले आहेत. 

धीरजकुमार हे अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षित असून त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग मध्ये बी.टेक केले आहे. २०१२ ते २०१५ या दरम्यान त्यांच्याकडे नांदेड जिल्ह्याधिकारी पदाची जबाबदारी होती. जुलै २०१६ ते मे २०१७ पुण्यात ते शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत होते. २०१८ पासून ते प्रतिनियुक्ती उत्तर प्रदेशात सरकारच्या सामाजिक विकास विभागात विशेष सचिव म्हणून होते. उत्तर प्रदेशातील पणन विभागाचे संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. 

आपल्या नियुक्तीनंतर सकाळ-ॲग्रोवनशी बोलताना नवे आयुक्त धीरज कुमार म्हणाले,‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी काल भेटलो. त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्‍यकता आहे, याकरिता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि सचिव यांचा कृषी विकासाचा जो अजेंडा आहे, त्यानुसार कामास प्राधान्य असेल.’’ 

‘‘शेतकरी केंद्रित  कृषी विभाग असण्याकडे माझा आग्रह असेल. प्राधान्याने बाजार समित्यांमधील डिजिटलाझेशन, शेतकरी कंपन्यांना अधिक प्राधान्य देऊन मोठ्या खरेदीदारांपर्यंत पर्यंत त्यांना पोचविणे, कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, बी-बियाणेपासून मार्केटिंग पर्यंत सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर कसे आणता येईल, याकडे जास्त लक्ष देणार आहे. कृषी क्षेत्रात चांगल्या बदलांकरिता माझे प्रयत्न असणार आहेत. आज मी पदभार स्वीकारणार आहे,’’ असे धीरज कुमार यांनी सांगितले. 

 
 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...