राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे; १८७ नवीन रुग्णांचे निदान : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १७६१ झाली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे; १८७ नवीन रुग्णांचे निदान : आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे; १८७ नवीन रुग्णांचे निदान : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १७६१ झाली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४९६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४६४१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी सतरा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात १७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे १२ तर पुणे येथील २, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी १ आहे. शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ६ महिला आहेत. कालपासून अतिरिक्त महासंचालक डॉ पी के सेन यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय शीघ्र प्रतिसाद पथक पुणे येथे कोविड १९ प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेत आहे. या पथकामध्ये डॉ सेन यांच्या सोबत डॉ रोहित बन्सल, वैद्यकीय तज्ञ आणि डॉ सौरभ मित्रा भूल तज्ञ यांचाही समावेश आहे.या पथकाने मागील २ दिवसात बी जे वैद्यकीय महाविद्यालय, नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध तसेच पिंपरीच्या वाय सी एम रुग्णालयास भेट दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com