आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजनांतील अटी लवचिक करा :  डॉ. उईके
आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजनांतील अटी लवचिक करा : डॉ. उईके

आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजनांतील अटी लवचिक करा : डॉ. उईके

नाशिक : कृषी विभागातर्फे आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषिपंप, विहिरी, ठिबक सिंचन आदी योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी त्यातील अटी लवचिक कराव्या. त्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा फायदा मिळू शकेल, अशी सूचना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली.

आदिवासी विकास विभागातर्फे बुधवारी (ता. ३) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उईके बोलत होते. या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, राजाभाऊ वाजे, आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, आदिवासी अपर आयुक्त गिरीश सरोदे आदी उपस्थित होते.

डॉ. उईके म्हणाले, ‘‘प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. या वैद्यकीय तपासणीपासून आश्रमशाळेतील एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ होईल, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. राजीव गांधी अपघात विमा योजनेचाही लाभ त्यांयापर्यंत पोचवावा. आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची दरमहा वैद्यकीय तपासणी करा. त्यांची आरोग्यपत्रिका बनवून ती अद्ययावत ठेवण्यासाठी आदिवासी विभाग, महिला व बालविकास व आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com