Agriculture news in marathi 21 factories started in Nanded division | Agrowon

नांदेड विभागात २१ कारखाने सुरु

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगामात विभागात आजपर्यंत सात सहकारी, तर १४ खासगी असे एकूण २१ साखर कारखाने सुरु झाले आहेत.

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगामात विभागात आजपर्यंत सात सहकारी, तर १४ खासगी असे एकूण २१ साखर कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी दहा लाख ६० हजार ५१३ टन उसाचे गाळप केले. तर आठ लाख ३३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२१-२२ साठी २७ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील २५ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यापैकी २१ कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ७.८६ आहे. हिंगोली व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याने एफआरपी दिली नसल्याने त्या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला नाही.

सुरु कारखाने

परभणी जिल्हा : रेणुका शुगर देवनंद्रा, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अमडापूर, योगेश्वरी शुगर लिंबा, गंगाखेड शुगर माकणी, ट्वेटींवन शुगर सायखेडा, बळीराजा कानडखेड.

हिंगोली जिल्हा : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, शिऊर साखर कारखाना वाकोडी.

नांदेड जिल्हा : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, सुभाष शुगर हडसणी, शिवाजी सर्व्हीस स्टेशन बाऱ्हाळी, कुंटूरकर शुगर कुंटूर, व्यंकटेश्वरा ॲग्रो शुगर शिवणी.

लातूर जिल्हा : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिंलोलीराव वाडी, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, विलास सहकारी साखर कारखाना तोंडार, रेणा सहकारी साखर कारखाना निवडा, सिद्धी शुगर उजना, जागृती शुगर तळेगाव, ट्वेटींवन शुगर्स माळवटी. 


इतर बातम्या
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...