agriculture news in Marathi 21 percent water stock in dams Maharashtra | Agrowon

राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

राज्यात १३ जूनअखेरपर्यंत राज्यातील तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता.

पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. राज्यात १३ जूनअखेरपर्यंत राज्यातील तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याच काळात २४.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

राज्यात दरवर्षी मे महिन्यात तीव्र पाण्याची टंचाई भासते. यंदा काही ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा सुरू होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांमध्ये चांगला साठा झाला होता. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला चांगले पाणी आले.

मात्र, काही भागांत पाण्याचा अति उपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची मागणी कमी झाली. त्यामुळे धरणांत एप्रिलअखेरपर्यंत बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते. 

पुणे विभागात सर्वाधिक पाणी 
पुणे विभागात ९८.८५ टीएमसी म्हणजेच १८.४१ टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागात ३३.६४ टीएमसी (२७.१५ टक्के), अमरावती विभागात २८.२४ टीएमसी (१९.६३ टक्के) नागपूर विभागात ४१.५९ टीएमसी (२५.५७ टक्के) नाशिक विभागात ४३.६५ टीएमसी (२०.६ टक्के) तर औरंगाबाद विभागात ६१.६० टीएमसी म्हणजेच २३.६७ टक्के पाणीसाठा आहे. 

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये) 

प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्के 
मोठे प्रकल्प १४१ २६१.८६ २५.६ 
मध्यम प्रकल्प २५८ ३०.५३ १५.९८ 
लघु प्रकल्प २८६८ १५.२० ६.७३ 
एकूण ३,२६७ ३०७.६० २१.३७ 

इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...