Agriculture news in marathi, 219 farms school for Gram crop management in Parbhani | Agrowon

परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९ शेतीशाळा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान बदलानुकूल शेती प्रकल्प - पोकरा) अंतर्गंत हरभरा पीक पेरणी ते काढणी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील निवडक गावांमध्ये २१९ शेतकरी शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान बदलानुकूल शेती प्रकल्प - पोकरा) अंतर्गंत हरभरा पीक पेरणी ते काढणी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील निवडक गावांमध्ये २१९ शेतकरी शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या प्रकल्पांतर्गंत निवड झालेल्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ६५ आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये १५४ असे एकूण २१९ शेतकरी शेतीशाळा होतील. हरभरा पिकांवरील किड, रोग आदींची तुलनात्मक निरिक्षणे घेण्यात येतील. त्यासाठी निवडक गावातील यजमान शेतकऱ्यांच्या (होस्ट फार्मर) शेतावर एक एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आणि एक एकर क्षेत्रावर शेतकरी पध्दतीने हरभऱ्याचे पेरणी ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन करण्यात येईल. त्यासाठी या शेतकऱ्यांयाना कृषी विभागाकडून हरभऱ्याच्या जॅाकी ९२१८ या वाणाचे बियाणे, बीज प्रक्रिया घटकाचा पुरवठा करण्यात येईल. एक एकर क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आठवड्यातील ठराविक दिवशी गावातील इतर शेतकरी या शेतकऱ्यांच्या शेतावर एकत्रित येऊन हरभरा पिकांची निरीक्षणे घेतील. कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, प्रकल्प विशेषज्ञ दीपक विभुते, प्रकल्प सहायक दिपक नागुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शेतीशाळा होतील. आंगलगाव (ता. परभणी) येथील शाळेमध्ये शेतकऱ्यांना रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान पेरणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माणिकराव शिंदे आदीसह शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...