Agriculture news in Marathi 22 farmers commit suicide in lockdown | Agrowon

चंद्रपुरात लॉकडाउनकाळात २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

चंद्रपूर ः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शासकीय धोरणाला कंटाळत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अधिकच वाढल्याने गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर ः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शासकीय धोरणाला कंटाळत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अधिकच वाढल्याने गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे प्रभावित होणाऱ्या इतर क्षेत्रांप्रमाणेच शेतीक्षेत्रही आहे. घरात पडून असलेल्या शेतमालाची विक्री अनेक शेतकऱ्यांना करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी आर्थिक गरजांच्या पूर्ततेकरिता हमीभाव केंद्राऐवजी व्यापाऱ्यांनाच आपला शेतमाल कमी दरात दिला. त्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याच्या नैराश्‍यातून अखेरीस जिल्ह्यात तब्बल २२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात या शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचे धोरण शासनाचे आहे. त्याकरिता विहीत नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे. परंतु सद्यःस्थितीत प्रशासकीय यंत्रणा कोरोना संदर्भातील कामात गुंग असल्यामुळे मदतीसाठी पात्र, अपात्र शेतकरीविषयक बैठकच घेण्यात आली नाही. परिणामी, या कुटुंबीयांना मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनची तीव्रता एप्रिल महिन्यात वाढली होती. त्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक आठ आत्महत्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...