नांदेड जिल्ह्यात २२ शिवभोजन केंद्रे कार्यान्वित

नांदेड : लॅाकडाऊनच्या काळात गरिब नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन थाळींच्या मूळ इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात २२ शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत.
22 Shivbhojan Kendras are operational in Nanded district
22 Shivbhojan Kendras are operational in Nanded district

नांदेड : लॅाकडाऊनच्या काळात गरिब नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन थाळींच्या मूळ इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात २२ शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत.

जिल्हयात दररोज २ हजार ५०० थाळींचा इष्टांक पूर्ण होत आहे. रविवार (ता.१२) पर्यंत ६४ हजार १९४ शिवभोजन थाळीचा लाभ गरजू व्यक्तींनी घेतला आहे. या अंतर्गत ३० मार्च पासून पुढील तीन महिने कालावधीसाठी प्रतिथाळी पाच रुपये याप्रमाणे आकारणी करण्यात येत आहे. 

शिवभोजन योजनेंतर्गंत जिल्हयासाठी ५०० थाळी इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये एकूण ४ शिवभोजन केंद्राची प्रत्येकी १२५ थाळीप्रमाणे निवड करण्यात आली. परंतु, कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे स्थतलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर व्यक्तींचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी या योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यात आला आहे.

मूळ थाळीच्या इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत प्रत्येकी १०० थाळींप्रमाणे इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यां‍स प्रत्येकी एक या प्रमाणे १५ शिवभोजन केंद्राची निवड केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये गरीब, गरजु व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध व्हा‍वे, त्यादृष्टीने शिवभोजनालयास सूचना देण्यात आल्या आहेत. शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या कालावधीत सुरु राहतील. भोजनालय चालकांनी प्रत्येक ग्राहकामध्ये कमीतकमी तीन फुट (एक मीटर) अंतर राहील, याची दक्षता घ्यावी.  भोजनालयात स्वच्छता ठेवा 

ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण द्यावे, सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. भोजन तयार करणाऱ्या, वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावे. भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जतुंक करावे, भोजनाची सर्व भांडी निर्जतुंक करावी, ग्राहकांना शक्यतो पॅक स्वरूपात भोजन (packed food) द्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com