अकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर

अकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर
अकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर

अकोला : यंदाच्या २०१९-२० वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाच्या वित्तीय मर्यादेत २२० कोटी ६८ लाख ५८ हजार रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. या प्रारूप आराखड्याला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ वर्षांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावालाही या वेळी मान्यता देण्यात आली. 

आराखड्यात सर्वसाधारण योजनेसाठी १२१ कोटी ९२ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ८३ कोटी ९५ लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी १४ कोटी ८१ लाख रुपयांचा समावेश करण्यात आला. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामधून विकासाची व जनकल्याणाची कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, नियोजन समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ''यंत्रणांनी मागणी केल्यानुसार जिल्ह्यातील अतिरिक्त मागणी २५४ कोटी ९४ हजार रुपयांची आहे. वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीवेळी जिल्ह्याचा अतिरिक्त मागणीचा ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.''

''जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधेच्या जास्तीत जास्त कामांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मिती, रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणारे काम हे विहित कालावधीत पूर्ण होऊन त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. या कामांत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये'', असेही डॉ. पाटील यांनी बजावले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com