agriculture news in Marathi 222 ton vegetables and fruits sell in pune Maharashtra | Agrowon

पुण्यात २२२ टन फळे, भाजीपाल्याची थेट विक्री 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

पुणे बाजार समिती बंद असल्यामुळे फळे, भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. थेट विक्रीसाठी शेतकरी, शेतकरी गट व कंपन्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही प्रमाणात अडचणी येत असल्या तरी शेतकरी पुढाकार घेऊन शहरातील सोसायट्याधारकांना थेट भाजीपाल्याची विक्री करू लागला आहे. 
- विजय कानडे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे 

पुणे ः पुण्यातील बाजार समिती बंद असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गटांकडील फळे, भाजीपाल्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. थेट विक्रीत सहभागी झालेल्या ५०३० शेतकरी आणि शेतकरी गटांनी सुमारे २२२ टन फळे, भाजीपाल्याची थेट विक्री केली आहे. सध्या शहरातील नागरिकांची मागणी वाढत असून ग्राहकांनी योग्य ती काळजी घेऊन फळे व भाजीपाल्याची खरेदी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी उपसंचालक विजय कानडे यांनी दिली. 

२२ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने पुण्यातील मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्रीसाठी अडचणी येत आहे. त्यातच शेतकऱ्यांनी वाहतुकीसाठी परवाने घेतले असून काही ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी विक्रेते चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी येत होत्या. 

नागरिकांनी त्यांच्या सोसायटीमध्येच परवडणाऱ्या दरात ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून शेतकरी गट व शेतकरी कंपन्या यांच्याशी संपर्क साधून शहरात भाजीपाला पुरवठा करण्यात येत आहे. शेतकरी गट, कंपन्यांकडून पुरवठा होऊ शकणाऱ्या भाजीपाला आणि फळे यांच्या दराची माहिती असणारे फॉर्म भरून घेतले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण करून देण्यावर भर दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी व गटांनी भाजीपाला २७ मार्चपासून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली थेट विक्री सुरु केली आहे. 

सध्या पुणे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार ३० शेतकरी आणि शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना विक्रीसाठी शहरातील विविध सोसायट्यांमध्ये सुमारे दोन हजार ७५७ ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल घेऊन थेट विक्री करू लागले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. याशिवाय तालुका स्तरावर व गावपातळीवरही अनेक शेतकरी गट विक्री करत आहे. त्यामुळे गावागावातील नागरिकांना फळे व भाजीपाला उपलब्ध होत आहे. 

 

 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...