सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या ५२ जागांसाठी २२४ अर्ज

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या ५२ जागांसाठी मंगळवारी (ता. ७) २२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभागांची निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे त्या प्रभागातील इच्छुकांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाहीत.
224 applications for 52 seats of four Nagar Panchayats in Sindhudurg district
224 applications for 52 seats of four Nagar Panchayats in Sindhudurg district

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या ५२ जागांसाठी मंगळवारी (ता. ७) २२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभागांची निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे त्या प्रभागातील इच्छुकांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाहीत.

जिल्ह्यातील वाभवे वैभववाडी, कसई-दोडामार्ग, देवगड-जामसंडे आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम २४ नोंव्हेबरला जाहीर करण्यात आला. १ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची होती. सुरवातीचे तीन, चार दिवस थंड प्रतिसाद मिळाला. मात्र मंगळवारी अखेरच्या दिवशी इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गर्दी केली. त्यातच इतर मागास प्रवर्गातील प्रभागाची निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अखेर त्या त्या नगरपंचायतीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर मागास प्रवर्गातील उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर हा घोळ संपला.

दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची तारांबळ सुरू होती. चार नगरपंचायतीमध्ये प्रत्येक १७ प्रभाग आहेत. त्यामध्ये चार प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी होते. त्यामुळे सर्व नगरपंचायतीच्या १३ प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वैभववाडी नगरपंचायतीच्या १३ प्रभागांसाठी ५० अर्ज दाखल झाले.

दोडामार्ग नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ५१, कुडाळच्या १३ जागांसाठी ६२, तर देवगड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एकूण ५२ जागांसाठी २२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com